By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:08 IST
1 / 11 खोटारड्या लोकांशी व्यवहार करताना सावध राहणं केव्हाही चांगलं. मागणाच्या वागण्यातील काही बारीक बदल ते खोटं बोलत असल्याचे संकेत देतात. (0 Signs Indicates That Someone Is Lieing With You)2 / 11 खोटं बोलणारी व्यक्ती सहसा डोळ्यांत बघून बोलणं टाळते. एकतर ती इकडे तिकडे बघते किंवा सतत पापण्याची हालचाल करते.3 / 11विचारलेल्या प्रश्नाचे साधे उत्तम देण्याऐवजी हे लोक लांबलचक कथा सांगतात, जास्त माहिती देऊन ते स्वत:चा खरेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.4 / 11त्यांच्या बोलण्यात वारंवार बदल होतो. आज सांगितलेली गोष्ट उद्याच्या गोष्टींशी जुळत नाही. जर तुम्ही त्यांना तोच प्रश्न पुन्हा विचारला तर त्यांच्या उत्तरातील तपशील बदलतात.5 / 11खोटं बोलताना माणूस अस्वस्थ असतो. सतत हातांची बोटं चोळणं, पाय हलवणं ही भिती किंवा अस्वस्थतेची लक्षणं आहेत.6 / 11 जर तुम्ही त्यांच्या बोलण्याबद्दल क्रॉस प्रश्न विचारले तर ते लगेच रागवतात किंवा उलट तुमच्यावरच्या आरोप करायला सुरूवात करतात.7 / 11खोटारड्या व्यक्तीचे हास्य त्यांच्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही. ते फक्त ओठांनी हसतात त्यामुळे त्यांचे हसू कृत्रिम वाटते.8 / 11 आपल्या बोलण्यावर समोरच्याच्या विश्वास बसावा म्हणून हे लोक देवाची शपथ, आईशी शपथ किंवा खरं सांगतोय असे शब्द वारंवार वापरतात.9 / 11उत्तर देण्यासाठी वेळ मिळवण्यासाठी हे लोक तुम्ही विचारलेला प्रश्नच पुन्हा विचारतात किंवा काय म्हणालात, असं म्हणून वेळ मारून नेतात.10 / 11 खोटं बोलताना येणाऱ्या तणावामुळे बोलताना आवाज थरथरणं, घसा वारंवार साफ करणं किंवा पाणी पिण्याची इच्छा होणं अशी लक्षणं दिसून येतात.11 / 11शारीरशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते आणि तिथून पळ काढायचा प्रयत्न करते तेव्हा त्यांच्या पावलांची दिशा दरवाज्याच्या किंवा बाहेर जाण्याच्या मार्गाकडे असते.