By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 19:23 IST
1 / 11बालिशपणा ही स्थिती केवळ वयावर अवलंबून नसते तर ती व्यक्तीच्या वागण्याबोलण्यातून दिसून येते. १० प्रमुख लक्षणं पाहूया. (10 Signs Of Emotionally Immature Person)2 / 11 कधीही आपली चूक स्वीकारत नाही. काहीही चुकीचे घडल्यास ते नेहमी दुसऱ्यावर खापर फोडतात किंवा नवीन कारणं शोधतात.3 / 11लहान मुलाप्रमाणेच अशा व्यक्तींना आपल्या भावनांवर ताबा ठेवता येत नाही. मनासारखं झालं नाही करी लगेच चिडणं, ओरडणं किंवा तोंड फुगवून बसणं.4 / 11अशा व्यक्तींना वाटते की जग त्यांच्याभोवतीच फिरते. समोरच्या व्यक्तीच्या गरजा किंवा भावनांचा विचार न करता मला काय हवंय यालाच जास्त महत्व देतात.5 / 11आयुष्यातील महत्वाचे निर्णय किंवा जबाबदाऱ्या घेण्याऐवजी या व्यक्ती त्या टाळण्याचा प्रयत्न करतात. महत्वाच्या वेळीही ते विषयाला बगल देऊन थट्टा मस्करी करतात.6 / 11दुसऱ्यांना शारिरीक रूपावरून किंवा त्यांच्या चुकांवरून त्यांची सतत मस्करी करणं हे बालिशपणाचं लक्षण आहे. 7 / 11संवाद साधण्यापेक्षा या व्यक्तींना वाद जिंकण्यात जास्त रस असतो. समोरचा माणूस काय म्हणतोय हे ऐकून घेण्याऐवजी आरडाओरडा करून मीच कसा बरोबर आहे ते सिद्ध करणं.8 / 11कोणाहीबद्दल पूर्ण माहिती नसताना लगेच मत तयार करणं किंवा अफवांवर विश्वास ठेवून वागणं.9 / 11मैत्री असो वा नातेसंबंध कोणत्याही प्रकारची जबाबदारी किंवा कमिटमेंट घ्यायला त्या व्यक्ती घाबरतात ते नेहमी बंधनांपासून लांब पळतात.10 / 11 मिळणाऱ्या पैशांचा विचार न करता केवळ मौजमजेसाठी वायफळ खर्च करणं आणि भविष्यासाठी कोणतीही आर्थिक शिस्त न पाळणं11 / 11या व्यक्तींना नेहमी लोकांच्या नजरेत राहण्याची आणि कौतुक मिळवण्याची भूक असते. जर कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल तर ते अस्वस्थ होतात.