By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:54 IST
1 / 11भारतीय शिक्षिका आणि प्रसिद्ध कलाकार रूबल नागी यांनी दुबईत आयोजित 'वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट'मध्ये मानाचा 'ग्लोबल टीचर प्राइज २०२६' जिंकून जगभरात भारताची मान उंचावली आहे. 2 / 11या पुरस्कारासोबतच त्यांना १ मिलियन डॉलर (९ कोटी रुपयांहून अधिक) इतकं बक्षीस देण्यात आलं आहे. दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते त्यांना या ग्लोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.3 / 11रूबल नागी यांचा जन्म ८ जुलै १९८० रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला. त्या एक कुशल शिल्पकार, आर्ट इन्स्टॉलेशन एक्सपर्ट आणि चित्रकार आहेत. रूबल यांनी आपल्या कलेचा वापर समाजसेवेचे माध्यम म्हणून केला. 4 / 11२०१७ मध्ये राष्ट्रपती भवन संग्रहालयात प्रदर्शनासाठी आमंत्रित केल्या जाणाऱ्या त्या पहिल्या कलाकार ठरल्या होत्या. रूबल नागी यांनी शिक्षणाची ओढ असलेल्या मुलांसाठी २४ वर्षांपूर्वी एका लहान खोलीत फक्त ३० मुलांपासून सुरुवात केली होती. 5 / 11आज त्यांची 'रूबल नागी आर्ट फाउंडेशन' ही संस्था संपूर्ण भारतात ८०० हून अधिक शैक्षणिक केंद्र यशस्वीपणे चालवत आहे. या केंद्रांच्या माध्यमातून अशा मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवलं जातं, ज्यांना कधीही शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही.6 / 11झोपडपट्ट्यांमधील भिंतींना 'शैक्षणिक भित्तिचित्रांमध्ये'बदलल्याबद्दल रूबल नागी यांचा जागतिक स्तरावर गौरव करण्यात आला आहे. त्या भिंतींवर अशी चित्रं काढतात ज्यातून मुलं साक्षरता आणि गणित शिकतात. 7 / 11ही चित्रं केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण जागृतीबद्दलही मुलांना शिक्षित करतात. २०२२ मध्ये रूबल नागी यांचे 'द स्लम क्वीन' हे पुस्तक प्रकाशित झालं, ज्यामध्ये त्यांनी आपले अनुभव मांडले आहेत. 8 / 11विज्ञान आणि इतिहासासारखे कठीण विषय त्या कलेच्या माध्यमातून सोपे करून भिंतींवर मांडतात. शिक्षण केवळ चार भिंतींच्या आतच नाही, तर मोकळ्या आकाशाखालील शिक्षण दिलं जाऊ शकतं हे त्यांनी सिद्ध केलं आहे.9 / 11'ग्लोबल टीचर प्राइज' हे 'वर्की फाउंडेशन'तर्फे दिलं जातं, ज्याचे संस्थापक सनी वर्की आहेत. २०२६ हे या पुरस्काराचं १० वं वर्ष होतं. 10 / 11जगभरातील अशा शिक्षकांना हा अत्यंत महत्त्वाचा सन्मान दिला जातो ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन पद्धतीतून समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे.11 / 11रूबल नागी या ८.३ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेचा वापर भारतातील लहान मुलांसाठी नवीन शाळा आणि लर्निंग सेंटर्स उघडण्यासाठी करणार आहेत. मुख्य प्रवाहातील शिक्षण पद्धतीपासून दूर असलेल्या मुलांपर्यंत 'स्ट्रक्चर्ड लर्निंग' पोहोचवणं हे त्यांचं ध्येय आहे.