Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Pujya Priyadarshini : भारीच! दिवसा नोकरी, रात्री पुस्तकांशी मैत्री... ३ वेळा अपयश आल्यानंतरही गाठलं यशाचं शिखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:08 IST

1 / 10
पूज्य प्रियदर्शिनी यांनी सलग तीन वेळा अपयशाचा सामना करूनही हार मानली नाही आणि अखेर २०१८ मध्ये ऑल इंडिया रँक ११ मिळवून आयएफएस (IFS) अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
2 / 10
२०१३ मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर पूज्य यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात त्यांची पुरेशी तयारी नसल्यामुळे त्यांना यश मिळालं नाही. मात्र त्यांनी खचून न जाता पुन्हा तयारी सुरू केली.
3 / 10
दिल्ली विद्यापीठातून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे त्यांनी शिक्षण, नोकरी आणि यूपीएससीची तयारी या तिन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळल्या. त्या दिवसा नोकरी करायच्या आणि रात्री अभ्यास करून नोट्स तयार करायच्या.
4 / 10
बहुतेक उमेदवार सरकारी परीक्षेच्या तयारीसाठी नोकरी सोडतात, पण पूज्य यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी शिस्त, वेळेचं नियोजन आणि आत्मसंयम यांच्या जोरावर मर्यादित वेळेत अभ्यास पूर्ण केला.
5 / 10
२०१६ मध्ये त्या यशाच्या अगदी जवळ पोहोचल्या होत्या, पण २०१७ मध्ये त्यांना पूर्व परीक्षेतही (Prelims) यश मिळाले नाही. यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या आणि त्यांनी अभ्यास सोडण्याचा निर्णय घेतला.
6 / 10
आई-वडील स्वतः नागरी सेवेत असल्याने त्यांना या परीक्षेच्या स्वरूपाची कल्पना होती. त्यांनी पूज्य यांचा आत्मविश्वास वाढवला.
7 / 10
पूज्य यांनी पुन्हा स्वतःला सावरलं आणि आणखी काम केलं. त्यांनी आपल्या काही लक्ष केंद्रित केलं आणि अभ्यासाच्या पद्धतीत बदल केला. हा बदल त्यांच्या प्रवासाचा 'टर्निंग पॉईंट' ठरला.
8 / 10
२०१८ मध्ये त्यांच्या मेहनतीचे फळ मिळालं आणि त्यांनी देशात ११ वा क्रमांक पटकावला. त्यांचा रँक खूप चांगला असल्याने त्यांना आयएएस होण्याचा पर्याय होता, पण त्यांनी परराष्ट्र सेवेला (IFS) पसंती दिली.
9 / 10
आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरण निर्मितीमध्ये रस असल्याने त्यांनी हे क्षेत्र निवडले. पूज्य प्रियदर्शिनी यांची ही यशोगाथा शिकवते की योग्य नियोजन आणि शिस्तीच्या जोरावर कोणतंही मोठं लक्ष्य गाठता येतं.
10 / 10
अपयशाने खचून जाणाऱ्या तरुणांसाठी त्या एक आदर्श आहेत. विशेषतः नोकरी सांभाळून त्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
टॅग्स : प्रेरणादायक गोष्टी