Join us

Teacher's Day 2025 : त्या होत्या म्हणून आपण शिकलो! स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या ६ महिलांची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2025 17:07 IST

1 / 7
स्त्रीने घर सांभाळावं. शिक्षणाची काय गरज ? अशा प्रश्नांना तोडीसतोड उत्तर देऊन महिलांनाही शिक्षण मिळावं यासाठी झटणाऱ्या समाज सुधारकांमध्ये अनेक महिलाही होत्या. समाजाने वाळीत टाकले तरी घाबरल्या नाहीत. आज मुलींना आरामात शिक्षण घेता येते याचे श्रेय अनेक समाजसुधारकांना जाते.
2 / 7
१८४८ मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरु झाली. त्यातील पहिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षण अपराध मानला जायचा अशा काळात त्यांनी एक शिक्षिका होऊन दाखवलं. फक्त मुलींसाठीच नाही तर बहुजन समाजातील मुलांना शिकवण्यासाठीही त्यांनी काम केलं.
3 / 7
रमाबाई रानडे यांचे नाव विसरुन चालणार नाही. त्यांनी मुलींना आणि महिलांनाही शिक्षणाचे महत्व समजावले. सगळ्यांनाच शिक्षणाची गरज असते. रमाबाईंनी रात्र शाळांसाठी काम केले. तसेच सेवा सदन सोसायटीमार्फत अनेक महिलांना त्यांनी मदत केली.
4 / 7
पहिल्या महिला मानसशास्त्र अभ्यासक म्हणजे इरावती कर्वे. त्यांचे अफाट लेखन, ऐतिहासिक माहिती जपण्यातील योगदान आणि एक शिक्षिका म्हणून केलेले कार्य सारेच फार गौरवशाली आहे. त्या एक संशोधक होत्या. समाजशास्त्राच्या अभ्यासक होत्या.
5 / 7
प्रसिद्ध कवयित्री महादेवी वर्मा यांनी प्रयाग महिला विद्यापीठाची स्थापना केली. त्यांनी महिला सशक्तीकरणासाठी फार कार्य केले तसेच एक वकिल म्हणूनही कार्यरत होत्या. विविध क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत. अनेक महिलांमध्ये त्यांनी अस्तित्वाची भावना निर्माण केली.
6 / 7
पंडिता रमाबाई या एक समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि विदुषी होत्या. त्यांनी विधवा आणि गरजू महिलांना मदत केली, सुशिक्षित केले. रोजगारासाठी मार्ग शोधायला शिकवले. संस्कृतचा चांगलाच अभ्यास होता. त्यांना पंडिता ही पदवी त्यांच्या बौद्धिकक्षमतेमुळेच देण्यात आली.
7 / 7
चंद्रप्रभा सकियानी या आसाममधील एक नामवंत समाजसेविका, शिक्षिका आणि स्त्रीवादी होत्या. आसाममधील मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी कार्य केले. तसेच महिला सशक्तीकरणासाठी अनेक प्रखर निर्णय घेतले. त्या एक स्वातंत्र्यसेननीही होत्या.
टॅग्स : प्रेरणादायक गोष्टीशिक्षक दिनमहिलाभारत