Join us
Daily Top 2 Weekly Top 5

DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:37 IST

1 / 7
चित्रा कुमारीने अधिकारी होण्याचं मोठं स्वप्न पाहिलं होतं. परंतु महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये जाण्यासाठी पैसे नव्हते. तिने कधीही आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणं सोडलं नाही. खूप कष्ट केले.
2 / 7
अवघ्या विसाव्या वर्षी चित्रा डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस (DSP) झाली आहे. परिस्थितीसमोर तिने कधीही हार मानली नाही. शिक्षण घेताना अनेक अडचणीचा सामना केला.
3 / 7
भारतातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक असलेल्या बिहार लोकसेवा आयोग (बीपीएससी) उत्तीर्ण होऊन तिने डीएसपी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. २००८ मध्ये तिचे वडील सुरेश प्रसाद यांची नोकरी गेली.
4 / 7
घराचा खर्च भागवणं तेव्हापासून कठीण झालं. वडील अशा परिस्थिती खचले नाहीत. त्यांनी नीट विचार केला आणि आपल्या मुलांसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला.
5 / 7
मुलांच्या शिक्षणासाठी ते शेतकरी झाले, त्यांनी शेती केली, नंतर जमीन विकली. त्यांनी जमीन विकल्यानंतर मिळालेले पैसे बँकेत जमा केले आणि त्यातून मिळणारं व्याज आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी वापरलं.
6 / 7
बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंग क्लासेसची फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. चित्राने कोचिंगशिवाय तयारी केली आणि २० व्या वर्षी डीएसपी बनली.
7 / 7
बिहारमधील बक्सर येथील रहिवासी चित्रा हिने तिच्या पहिल्याच बीपीएससी प्रयत्नात कोणत्याही कोचिंगशिवाय ६७ वा रँक मिळवला. चित्रापासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
टॅग्स : प्रेरणादायक गोष्टी