सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

Published:December 29, 2022 05:29 PM2022-12-29T17:29:05+5:302022-12-29T17:44:42+5:30

2022 Special Women who Achieved Success २०२२ : या वर्षात ज्या महिलांनी भारतीय म्हणून अभिमान वाटावा अशी उत्तुंग कामगिरी केली त्यांना सलाम!

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

राजकारण असो या समाजकारण प्रत्येक क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. २०२२ या सरत्या वर्षात असंख्य महिलांनी मानाच्या शिरपेचात तुरा रोवला. त्यांनी आपल्या कामगिरीने संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. या वर्षी कोण कोणत्या थोर महिलांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली यासंदर्भात जाणून घेऊया.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

आजादी का अमृत महोत्सव या काळात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या. त्या आपल्या भारत देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती असून, त्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ह्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ उतरांचा सामना करत ही घौडदौड यशस्वीरित्या जिंकली आहे.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

सुप्रसिध्द बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने BWF सुपर 350 सय्यद मोदी स्पर्धा जिंकली आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने युवा स्टार मालविका बनसोडचा अवघ्या 35 मिनिटांत पराभव केला. माजी विश्वविजेत्या सिंधूचे सय्यद मोदी स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी 2017 मध्येही तिने या BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

क्रिकेट जगताला भारताने अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले आहेत. यातील एक म्हणजे भारताची अव्वल दर्जाची महिला क्रिकेटपटू मिताली राज. भारतीय महिला संघासाठी 23 वर्षे क्रिकेट खेळलेल्या मितालीने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, 39 वर्षीय मितालीने आजवर क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना अनेक रेकॉर्ड्स नावे केले आहेत.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

टीम इंडियाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने वेस्ट इंडिजविरुद्ध हॅमिल्टन येथे सुरु असलेल्या विश्वचषक सामन्यात इतिहास घडवला आहे. विंडीजच्या अनिसा मोहम्मद हिला बाद करून गोस्वामी आता महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी नंबर एक गोलंदाज बनली आहे.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूनं जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. कोलंबियामध्ये झालेल्या स्पर्धेत मीराबाईनं चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदकावर नाव कोरलं. जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील मीराबाईचे हे दुसरं पदक आहे.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत निखत झरीनने सुवर्ण पदक पटकावले. निखतने महिलांच्या ४८-५० किलो गटात उत्तर आयर्लंडच्या कार्लीचा ५-० असा पराभव केला. राष्ट्रकुल २०२२ मधील भारताचे हे ४८ वे आणि बॉक्सिंगमधील तिसरे सुवर्णपदक आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील निखतचे हे पहिलेच पदक आहे.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

साताऱ्यातील प्रियंका मोहिते या गिर्यारोहक तरुणीने जगातील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचे सिक्कीम येथील कांचनगंगा शिखर सर केले. कांचनगंगा या खडतर पर्वत शिखरावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम प्रियंकाने केला आहे. हा विक्रम करणारी प्रियंका मोहिते ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

सिनेसृष्टीतील दिग्गच अभिनेत्री आशा पारेख यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. "सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी", अशा शब्दांत आशा पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केला होत्या.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं मिस इंडिया २०२२चा किताब पटकावला आहे. ३ जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मिस इंडिया २०२२च्या अंतिम फेरीत ३१ स्पर्धकांवर मात करत सिनी शेट्टीने मिस इंडियाचा मुकूट पटकावला. तर, अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप व उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसऱ्या क्रमांकावर आली.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

प्रियांकाने फोर्ब्जच्या यादीत नाव कमावलेच. मात्र हॉलिवूडसह जगभर आपला ब्रॅण्डही मोठा केला. जागतिक स्तरावर प्रियांकाचे नाव पुन्हा पुन्हा झळकले.

सलाम!! २०२२ मध्ये देशाचा सन्मान वाढवणाऱ्या ११ कर्तबगार महिला, पाहा अभिमान वाटावा अशी कामगिरी

दीपीकाच्या बिकिनीवरुन जरी वर्ष संपता संपता वाद झाला असला तरी फुटबॉल वर्ल्ड कप अनावरणप्रसंगी तिनं उपस्थित असणं तिचा ब्रॅण्ड आता जागतिक ओळख सांगतो हेच सिध्द करणारं होतं.