आई आमदार! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन सरोज अहिरे अधिवेशनाला येतात तेव्हा.. कर्तव्य आधी.. पाहा फोटो

Published:December 20, 2022 11:25 AM2022-12-20T11:25:54+5:302022-12-20T11:51:37+5:30

MLA Nashik Saroj Ahire Attends Assembly With New Born Baby : नागपूर अधिवेशनाला अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन लावली उपस्थिती

आई आमदार! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन सरोज अहिरे अधिवेशनाला येतात तेव्हा.. कर्तव्य आधी.. पाहा फोटो

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आणि नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. याचे कारण म्हणजे अधिवेशनाच्या ठिकाणी त्या आपल्या अवघ्या २.५ महिन्यांच्या बाळाला घेऊन दाखल झाल्या आहेत (MLA Nashik Saroj Ahire Attends Assembly With New Born Baby).

आई आमदार! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन सरोज अहिरे अधिवेशनाला येतात तेव्हा.. कर्तव्य आधी.. पाहा फोटो

सरोज या नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार असून बाळाबरोबरच नागरिकांचे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे असल्याने आपण बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी लावल्याचे त्या म्हणाल्या.

आई आमदार! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन सरोज अहिरे अधिवेशनाला येतात तेव्हा.. कर्तव्य आधी.. पाहा फोटो

अवघ्या २.५ महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनासाठी हजेरी लावणाऱ्या अहिरे यांच्याबाबत समजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळाची आणि त्यांची विचारपूस केली. इतकेच नाही तर अशाप्रकारे अधिवेशनाला आल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.

आई आमदार! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन सरोज अहिरे अधिवेशनाला येतात तेव्हा.. कर्तव्य आधी.. पाहा फोटो

राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशाप्रकारे महिला आमदार आपल्या बाळासह आली होती. अशाप्रकारे दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे हे खरंच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आई आमदार! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन सरोज अहिरे अधिवेशनाला येतात तेव्हा.. कर्तव्य आधी.. पाहा फोटो

यावेळी सरोज अहिरे यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासू कल्पना वाघ हे देखील उपस्थित होते. विधानभवनात लहान बाळ आणि मातांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात बाळाला ठेवून त्यांनी अधिवेशनात हजेरी लावली. प्रशंसक असे बाळाचे नाव असून ३० सप्टेंबर रोजी त्याचा जन्म झाला.

आई आमदार! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन सरोज अहिरे अधिवेशनाला येतात तेव्हा.. कर्तव्य आधी.. पाहा फोटो

अशाप्रकारे बाळाला घेऊन अधिवेशनात उपस्थिती लावणाऱ्या अहिरे या पहिल्याच आमदार असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना आपले कर्तव्य बजावणारी महिला आमदार म्हणून त्यांचे कौतुक होत आहे.