IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:25 IST
1 / 8जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील रहिवासी अंबिका रैना या आयएएस अधिकारी आहेत. अपयशानंतर खचून न जाता त्यांनी मेहनतीने मोठं यश मिळवलं आहे. 2 / 8अंबिका यांनी यूपीएससी २०२२ च्या परीक्षेत १६४ वा रँक मिळवला, तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं. अडचणी असूनही ध्येय साध्य करता येतं हे त्यांच्या कारकिर्दीतून दिसून येतं.3 / 8स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अंबिका यांचं हे घवघवीत यश प्रेरणादायी आहे. अपयशानंतरही यश मिळतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे.4 / 8अंबिका रैना यांनी दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांचं स्वप्न अखेर साकार झालं.5 / 8ज्यूरिख कंपनीत इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना स्वित्झर्लंडमध्ये नोकरीची ऑफर मिळाली. पण त्यांनी ती सोडून स्वप्न पूर्ण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.6 / 8अंबिका सुरुवातीपासूनच नागरी सेवेसाठी वचनबद्ध होत्या. म्हणूनच त्यांनी भारतात येऊन तयारीसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचा निर्णय घेतला.7 / 8दोनदा अपयशी झाल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात १६४ वा रँक मिळवला. मुलाखतीची तयारी करण्यासाठी १०० हून अधिक मॉक इंटरव्ह्यू पाहिले. त्यानंतर रणनीती आखली.8 / 8आज इंटरनेट हा ज्ञानाचा खजिना आहे; त्याचा सुज्ञपणे वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे असं म्हणत अंबिका यांनी विद्यार्थ्यांना शक्य तितके जुने पेपर आणि मॉक टेस्ट सोडवण्याचा सल्ला दिला.