By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:01 IST
1 / 10IAS आणि IPS सारख्या मोठ्या पदांवर काही जणच पोहोचू शकतात. या यशस्वी लोकांमध्ये नागपूरचे अर्चित चांडक आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने सिद्ध केलं की देशाची सेवा करण्याची इच्छा कोणत्याही मोठ्या पॅकेजच्या नोकरीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.2 / 10अर्चित चांडक यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूरमध्ये झाला. ते लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. २०१२ मध्ये जेव्हा त्यांनी JEE दिली तेव्हा त्यांनी शहरात अव्वल क्रमांक मिळवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या यशाने त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीला सुरुवात झाली.3 / 10जेईईमध्ये यशानंतर, अर्चित यांनी देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था IIT दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली. अभ्यासादरम्यान त्यांला जाणवलं की त्याचे ध्येय कॉर्पोरेट क्षेत्र नाही तर सार्वजनिक सेवा आहे.4 / 10इंटर्नशिप दरम्यान अर्चित चांडक यांचं टॅलेंट पाहून एका जपानी कंपनीने त्यांना वार्षिक ३५ लाख रुपयांच्या पगाराचं पॅकेज देऊ केलं. ही ऑफर कोणत्याही विद्यार्थ्यासाठी सुवर्णसंधी असू शकते, परंतु अर्चित यांचं स्वप्न वेगळं होतं. 5 / 10अर्चित यांनी मोठ्या पगाराची ही नोकरी थेट नाकारली आणि सरकारी सेवेत जाऊन देशासाठी काम करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. बी.टेक पूर्ण केल्यानंतर, त्याने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. 6 / 10२०१८ मध्ये अर्चितने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया १८४ रँक मिळवला. या मोठ्या यशानंतर त्यांना भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) केडर मिळालं.7 / 10अर्चित यांची पहिली पोस्टिंग भुसावळमधील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) म्हणून झाली. येथे त्यांनी आपल्या कामाने लोकांचा विश्वास जिंकला. 8 / 10अर्चित चांडक यांना यानंतर प्रमोशन देण्यात आलं आणि नागपूरमध्ये पोलीस उपायुक्त (डीसीपी) म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.9 / 10अर्चित यांना अभ्यास आणि नोकरीसोबतच फिटनेसचीही आवड आहे. त्यांनी ४२ किमी मुंबई मॅरेथॉन पूर्ण केली आहे. एवढंच नाही तर त्यांना बुद्धिबळ खेळायलाही खूप जास्त आवडतं.10 / 10अर्चित चांडक यांनी यूपीएससी बॅचमेट आयएएस सौम्या शर्मा यांच्याशी लग्न केलं. अशाप्रकारे दोघेही समाज आणि देशासाठी एकत्र काम करत आहेत.