Join us

Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:19 IST

1 / 11
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो तरुण ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचं स्वप्न पाहतात, पण फार कमी जणांना यश मिळतं. IPS आशना चौधरी यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे.
2 / 11
आशना चौधरी यांनी अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने मोठं यश मिळवलं आहे. अनेकदा अपयश आलं पण त्या खचल्या नाहीत, पुन्हा उभ्या राहिल्या आणि स्वप्न साकार केलं. आता त्यांना मथुरेत एक नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
3 / 11
आशना चौधरी या एक तरुण आणि प्रतिभावान आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९९८ रोजी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील पिलखुवा येथे झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण सेंट झेवियर्स स्कूल (पिलखुवा), सेंट मेरी स्कूल (उदयपूर) आणि दिल्ली पब्लिक स्कूल (गाझियाबाद) येथे झालं. बारावीत ९६.५% गुण मिळवले.
4 / 11
दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आणि नवी दिल्लीतील साउथ एशियन युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. तिच्या शैक्षणिक पार्श्वभूमीने यूपीएससी तयारीत महत्त्वाची भूमिका बजावली.
5 / 11
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेचच आशना यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. २०२० मध्ये त्या पहिल्यांदा परीक्षेला बसल्या, पण त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला, ज्यामध्ये त्या फक्त २.५ गुणांनी गेल्या.
6 / 11
या अपयशांनंतरही आशना यांनी हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात रणनीती बदलली आणि कठोर परिश्रम केले. याचा परिणाम असा झाला की, त्यांनी २०२२ च्या परीक्षेत दमदार कामगिरी केली आणि मोठं यश मिळवलं.
7 / 11
तिसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक ११६ मिळवला. एकूण ९९२ गुण मिळवले, ज्यात लेखी परीक्षेत ८२७ गुण आणि मुलाखतीत १६५ गुण समाविष्ट आहेत. या रँकच्या आधारे त्या आयएएस बनू शकल्या असत्या, परंतु त्यांनी आयपीएस निवडलं, जे कायदा आणि सुव्यवस्था आणि जनसेवेबद्दल त्यांचं समर्पण दर्शवतं.
8 / 11
आशना चौधरी यांचं लग्न आयएएस अधिकारी अभिनव सिवाच यांच्याशी झालं आहे, ज्यांनी २०२२ मध्ये यूपीएससी सीएसईमध्ये १२ वा रँक मिळवला होता. दोघांची ओळख प्रशिक्षणादरम्यान झाली आणि त्यानंतर त्यांचं लग्न झालं. अभिनव सध्या हरियाणा केडरमध्ये कार्यरत आहे.
9 / 11
२६ जुलै २०२५ रोजी आशना चौधरी यांनी मथुरेत सहाय्यक पोलिस अधीक्षक (ASP) म्हणून पदभार स्वीकारला. मथुरा शहर आणि पोलीस लाईनची कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
10 / 11
आशना चौधरी यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता, खूप प्रयत्नांनंतर त्यांना यश मिळालं आहे. आशना सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून त्यांचे सुंदर फोटो पोस्ट करत असतात.
11 / 11
टॅग्स : प्रेरणादायक गोष्टी