IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:53 IST
1 / 9मीशा सिंह या २०१६ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकारी होण्याचं मोठं स्वप्न पाहिलं आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. 2 / 9कठोर परिश्रमानंतर मीशा सिंह तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाल्या आणि आयएएस अधिकारी बनल्या. एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या मीशा आपल्या कष्टाने या पदावर पोहोचल्या.3 / 9मिशा यांचे वडील आनंद सिंह हे शेतकरी आहेत आणि त्यांची आई विनोद कंवर गृहिणी आहे. २०१५ मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेत ६४ वा रँक मिळवला आणि आपलं टॅलेंट दाखवून दिलं.4 / 9मीशा सिंह यांनी डॉ. राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केलं. त्यानंतर तिने नागरी सेवांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन प्रयत्नात अपयशी ठरल्या पण हार मानली नाही.5 / 9दिल्लीला जाऊन कायद्यात पीजी डिप्लोमा करून तयारी सुरू ठेवली. हे करत असतानाच अभ्यास सुरू ठेवला. खूप प्रयत्न केले. आपलं स्वप्न साकार केलं.6 / 9तिसऱ्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि मिशा यांची निवड झाली. तिसऱ्या प्रयत्नात ६४ वा रँक मिळवला आणि आयएएस पद मिळालं.7 / 9मीशा म्हणतात की, प्रशासकीय सेवेची निवड करण्याचं मुख्य कारण म्हणजे कामाची विविधता आणि समाजाची सेवा करण्याची संधी. त्यांचा असा विश्वास आहे की व्यवस्थेत बदल आणि चांगलं करिअर दोन्ही शक्य आहे.8 / 9मध्य प्रदेशात प्रशासकीय फेरबदलानंतर, आयएएस अधिकारी मीशा सिंह यांनी रतलाम जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. शुक्रवारी, कालिका माता मंदिराला भेट दिली, प्रार्थना केली आणि नंतर कार्यालयात पोहोचल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वागत केलं.9 / 9मीशा सिंह यांनी विविध भूमिकांमध्ये आपलं नेतृत्व कौशल्य दाखवलं आहे. सार्वजनिक सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मीशा सिंह सकारात्मक प्रभाव पाडत आहे, कार्यक्षम प्रशासन आणि विकास सुनिश्चित करत आहे.