कौतुकास्पद! लंडनमधील लाखो रुपयांची नोकरी सोडली, IAS बनून रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 14:37 IST
1 / 9आयएएस दिव्या मित्तल मूळच्या हरियाणातील रेवाडी येथील आहेत. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून बी.टेक केलं आणि नंतर आयआयएम बंगळुरूमधून एमबीए केलं. 2 / 9दिव्या यानंतर नोकरी करण्यासाठी लंडनला गेल्या. लाखो रुपयांची नोकरी असूनही परदेशात त्यांचं मन रमलं नाही. तेव्हा त्या भारतात परत आल्या.3 / 9यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करून इतिहास रचला.4 / 9दिव्या मित्तल सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. त्या अशा प्रतिभावान लोकांपैकी एक आहे ज्यांनी आयआयटी, आयआयएम सारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलं आणि परदेशात नोकरी केली.5 / 9आयएएस दिव्या यांचे पती गगनदीप सिंह हे देखील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. दोघांनीही नोकरी सोडली आणि भारतात परत आले.6 / 9यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. परत आल्यानंतर, कोचिंग ज्वाईन करण्याऐवजी सेल्फ स्टडी सुरू केला.7 / 9गगनदीप सिंह २०११ मध्ये आयएएस झाले आणि दिव्या मित्तल यांचीही २०१२ मध्ये निवड झाली.8 / 9दिव्या गुजरात कॅडरच्या आयपीएस झाल्या. २०१३ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली.9 / 9आयएएस होण्याचं स्वप्न घेऊन दिव्या यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि ऑल इंडिया ६८ वा रँक मिळवून आयएएस अधिकारी झाल्या.