By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:34 IST
1 / 12हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मेहम येथील रहिवासी अंकिता चौधरीने कठीण काळातही हार मानली नाही. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतले. अखेर तिला घवघवीत यश मिळालं.2 / 12अंकिताने दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. नेहमीच अभ्यासात टॉपर असलेल्या अंकिताने IAS अधिकारी बनून देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहिलं. 3 / 12ग्रॅज्युएशन केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. पण २०१७ मध्ये, जेव्हा ती तिचा पहिला प्रयत्न करत होती, तेव्हा तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती.4 / 12UPSC परीक्षेत अपयशी ठरल्याच्या दुःखाव्यतिरिक्त, त्याच वर्षी तिच्या आईचं निधन झालं. 'माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती होती. तिच्या जाण्यानंतर, सर्वकाही रिकामं वाटलं' असं अंकिताने म्हटलं.5 / 12जेव्हा अंकितावर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा तिच्या वडिलांनी तिला खचू दिलं नाही. 'बेटा, तू तुझ्या आईचे स्वप्न पूर्ण करशील' असं म्हटलं आणि कदाचित हे एक वाक्य अंकिताच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट बनलं.6 / 12आईच्या आठवणी आणि वडिलांच्या विश्वासामुळे अंकिताने २०१८ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी, तिने केवळ यूपीएससी उत्तीर्ण केली नाही तर ऑल इंडिया १४ वा रँक मिळवला. 7 / 12अंकिताचा ऑप्शनल विषय हा पब्लिक एडमिनिस्ट्रेशन होता. अंकिताचं यश केवळ वैयक्तिक विजय नव्हता, तर अपयशाने निराश झालेल्या अनेक तरुणांसाठी आशेचा किरण होता. 8 / 12'अपयशाला घाबरायचं नाही, ते तुम्हाला धडा शिकवतं आणि जेव्हा तुम्ही धडा शिकता तेव्हा यश तुमच्याकडे येतं' असंही सांगितलं. अंकिता आज एक आयएएस अधिकारी आहे. 9 / 12सरकारी घर, कार, ड्रायव्हर आणि इतर सुविधा तिच्याकडे आहेत. पण अंकिताचं खरं समाधान हे आहे की ती आता लोकांच्या जीवनात बदल घडवू शकते. 10 / 12अंकिता म्हणते की, तिची आई तिला नेहमी म्हणायची, 'मुली, असं काही कर की लोक तुला आशीर्वाद देतील.' अंकिता आता तेच करत आहे. 11 / 12अंकिता सोशल मीडियावर देखील एक्टिव्ह आहे. ती इंस्टाग्रामद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधते, प्रेरणादायी गोष्टी शेअर करते आणि यूपीएससीच्या कठीण मार्गावर जाणाऱ्या तरुणांना महत्त्वाची माहिती देते12 / 12'कधीही हार मानू नका, कारण यश तुमच्या संयमाची परीक्षा घेतं' असं अंकिता चौधरी नेहमीच सर्वांना सांगत असते. तिच्यापासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे.