Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:46 IST
1 / 12एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रियल यादव यांची यशोगाथा अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे. अकरावीत नापास झालेल्या प्रियल आता मध्य प्रदेशात डेप्युटी कलेक्टर आहेच. एमपीपीएससी परीक्षा एकदा किंवा दोनदा नाही तर तीन वेळा क्रॅक आहे.2 / 12अकरावी नापास होण्याच्या अपयशापासून ते मध्य प्रदेशात डेप्युटी कलेक्टर बनण्यापर्यंत प्रियल यादव यांनी आपल्या आयुष्यात खूप मोठा पल्ला गाठला आहे. असंख्य अडचणींवर मात केली आहे. 3 / 12प्रियल यादव मूळच्या मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे. मुलाखतींमध्ये सांगितलं की, आई फक्त सातवी शिकली, तर वडील तिसरी पास आहेत, तरीही त्यांनी प्रियल यांना इंदूरला शिक्षणासाठी पाठवलं.4 / 12प्रियल लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थिनी होत्या. दहावीत ९०% गुण मिळाले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. नातेवाईकांच्या आग्रहावरून त्यांनी मेडिकल स्ट्रीममध्ये जाण्याचा विचार केला, ज्यामुळे त्या अकरावीत नापास झाल्या.5 / 12प्रियल यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, 'मी दहावीपर्यंत टॉपर होते. नातेवाईकांच्या दबावामुळे मी अकरावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित हे विषय निवडले, मला या विषयांमध्ये रस नव्हता आणि मी फिजिक्समध्ये नापास झाले.'6 / 12प्रियल आपल्या यशाचं श्रेय पालकांना देतात, ज्यांनी त्यांना अभ्यासात पाठिंबा दिला आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले असूनही त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. शिवाय, ज्या समाजात मुलींचे लग्न लवकर केले जाते, तिथे पालकांनी कधीही दबाव आणला नाही. 7 / 12'मी अशा ग्रामीण भागातून येते जिथे मुलींचं लग्न लहान वयातच केले जाते, पण माझ्या पालकांनी लग्नासाठी माझ्यावर कधीही दबाव आणला नाही. त्यांनी मला माझं शिक्षण पूर्ण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं' असं सांगितलं.8 / 12१२वी नंतर प्रियलला यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एडमिशन मिळालं. एका मोठ्या कंपनीत चांगल्या नोकरीची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्या नागरी सेवांमध्ये सामील होऊ इच्छित होत्या. 9 / 12प्रियल यांनी वडिलांना सांगितलं की, त्यांना ही नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षेची तयारी करायची आहे. सुरुवातीला वडील नाराज होते, परंतु नंतर त्यांनी होकार दिला. ११वीत नापास होऊनही चिकाटी दाखवली आणि शेवटी संयम आणि कठोर परिश्रमाने यश मिळवलं.10 / 12मध्य प्रदेश नागरी सेवा परीक्षा (MPPSC PCS परीक्षा) तीन वेळा उत्तीर्ण केली. २०१९ मध्ये पहिला प्रयत्न केला, प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत उत्तीर्ण होऊन १९ वा रँक मिळवला. जिल्हा रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले. 11 / 12 २०२० मध्ये पुन्हा MPPSC परीक्षा दिली आणि ३४ वा रँक मिळवला. यावेळी सहकार विभागात सहाय्यक आयुक्त पदासाठी निवड झाली. दुसऱ्या प्रयत्नात तिला कमी रँक मिळाला, म्हणून तिने २०२१ मध्ये पुन्हा एमपीएससी परीक्षा दिली12 / 12तिसऱ्यांदा परीक्षा उत्तीर्ण होऊन रँक सुधारला आणि १४ वा रँक मिळवला. संपूर्ण राज्यातील टॉप १० महिला उमेदवारांच्या यादीत स्थान मिळवलं. आज त्या मध्य प्रदेशात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.