अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 17:02 IST
1 / 11फिरण्याची आवड असली की माणूस सर्वच गोष्टी विसरून जातो. त्याला वयाचं बंधन राहत नाही. फक्त जगण्याचा मनमुराद आनंद घेणंच त्याला माहित असतं. अशीच एक भन्नाट गोष्ट आता समोर आली आहे. 2 / 11इंदिरा एम यांना लोक प्रेमाने 'ट्रॅव्हल अम्मा' म्हणतात. केरळमधील त्रिशूर येथील ७० वर्षांच्या इंदिरा एकेकाळी गृहिणी आणि एलआयसीची कर्मचारी होत्या. पण आज त्या इतरांसाठी जगभर प्रवास करण्याची प्रेरणा बनल्या आहेत.3 / 11इंदिरा यांचा हा अनोखा प्रवास वयाच्या साठीनंतर सुरू झाला. कुटुंब आणि मुलांच्या सर्व जबाबदाऱ्या संपल्या तेव्हा त्यांना बालपणी पाहिलेलं जगभर फिरण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. 4 / 11सर्वप्रथम भारतातील मंदिरं आणि हिल स्टेशन्सपासून सुरुवात केली. नंतर ती एकट्याच दुबई, युरोप गेल्या. आजपर्यंत त्यांनी ३५ हून अधिक देश आणि शेकडो शहरांना भेट दिली आहे. सोलो ट्रिप केली आहे. 5 / 11प्रत्येक प्रवासाने त्यांना एक नवीन अनुभव दिला. टांझानियाच्या जंगलात एक रोमांचक सफारी केली. जपानमध्ये ट्रेनची शांतता अनुभवली, इटलीमध्ये पिझ्झाचा आस्वाद घेतला आणि नेपाळमध्ये हिमालयाचं सौंदर्य पाहिलं. प्रत्येक ठिकाण अनुभवलं.6 / 11इंदिरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आधी मी माझ्या मुलांची स्वप्नं पूर्ण केली, आता मुलं माझी स्वप्नं पूर्ण करण्यास मला मदत करत आहेत. वय ही फक्त एक संख्या आहे, खरी ताकद तुमच्या हिमतीत आणि स्वप्नांमध्ये आहे.'7 / 11'माझ्या पहिल्या सोलो ट्रिप दरम्यान मी फक्त एवढीच आशा केली होती की, इतके पैसे खर्च केल्यानंतर मला मजा आली पाहिजे. याशिवाय मला जराही कशाची भीती वाटली नाही.' 8 / 11'मला नेहमीच फिरायला आवडायचंय पण लग्नाच्या आधी आर्थिक परिस्थितीमुळे तसं करता आलं नाही. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे शक्य झालं नाही. पण आता मला हवं तसं जगता येत आहे.'9 / 11'मुलांनी मला प्रोत्साहन दिलं. मी माझा प्रवास खूप उशीरा सुरू केला पण तुम्ही तसं करू नका. आधीपासूनच तुमची आवड जोपासा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो.'10 / 11'सोलो ट्रिपचा अनुभव हा विलक्षण असतो. तुम्हाला एक खास आनंद मिळतो. तुम्ही जग तुमच्या नजरेने, तुम्हाला हवं तसं पाहायला सुरुवात करता. प्रवासादरम्यान भन्नाट अनुभव येतात. वेगवेगळी माणसं भेटतात.'11 / 11वर्षानुवर्षे आपण एका रुटीनमध्ये, चौकटीत अडकलेलो असतो. त्यातून बाहेर येऊन स्वत:ला शोधण्याची संधी ही सोलो ट्रिपमधून मिळते. इंदिरा एम आपल्या ओळखीच्या लोकांना सोलो ट्रिप करण्याचा सल्ला हमखास देतात.