मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

Published:October 5, 2023 10:59 AM2023-10-05T10:59:14+5:302023-10-05T11:06:52+5:30

मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

Asian Games 2023: चीनमधील होंगझाेऊ येथे आशियायी क्रिडा स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहेत. या स्पर्धांमध्ये भारताची धावपटू हरमिलन कौर बैंस ही वेगवान धावली आणि ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारतासाठी रौप्यपदक पटकावलं....

मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

संपूर्ण भारतासाठीच हा अतिशय अभिमानाच क्षण आहे. धाव पूर्ण करून जसं तिने रौप्य पदकावर भारताचं नाव कोरलं तसा या विजयासोबत आणखी एक अनोखा योगायोग जुळून आला.

मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

तो म्हणजे तिची आई माधुरी सिंह यांनीही २००२ साली झालेल्या आशियायी क्रिडा स्पर्धांमध्ये ८०० मीटरची धाव पुर्ण करून भारतासाठी रौप्य पदक पटकावलं होतं. २००३ साली माधुरी यांना अर्जून पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलं आहे.

मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

त्यामुळेच या मायलेकींची जबरदस्त चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू असून हरमिलनने खेळाचं प्रशिक्षण आईच्या पोटात असल्यापासूनच सुरू केलं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मुळची पंजाब येथील होशियारपूरची असलेल्या हरमीलनचा जन्म १९९८ साली झाला.

मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

या दोघी मायलेकींची एक रोमांचक गोष्टही यानिमित्ताने चर्चेत आली आहे. एकदा माधुरी यांना एका जॉबसाठी १५०० मीटर धावण्याची ट्रायल द्यायची होती. त्यावेळी त्या गरोदर होत्या आणि त्यांच्या पोटात हरमीलन होती. पण तरीही गरोदरपणातही त्यांनी ती धाव घेतली होती.

मायलेकीने देशासाठी जिंकले पदक! देशासाठी खेळायचे म्हणून सर्वस्व पणाला लावून खेळणाऱ्या आई आणि मुलीची वाचा गोष्ट

हरमिलनने वडील अमनदीप सिंह यांनी देखील १९९६ साली झालेल्या दक्षिण आशियायी क्रिडा स्पर्धांमध्ये १५०० मीटर शर्यतीत भारतासाठी पदक पटकावले आहे. या खेळाडू माता- पिता आणि त्यांच्या लेकीने देशासाठी दिलेले योगदान खरोखरच कौतूकास्पद आहे.