By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:32 IST
1 / 7अरुणाचल प्रदेशची रूपा बायोर ही तायक्वांदो जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर झेप घेणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.2 / 7रूपाची ही प्रगती तिने गेल्या काही वर्षांत खेळाप्रती दाखवलेलं सातत्य आणि कठोर परिश्रम दर्शवते. यापूर्वी जागतिक क्रमवारीत ६ वं स्थान आणि आशियाई क्रमवारीत पहिलं स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली होती. 3 / 7जागतिक क्रमवारीतील वाटचाल थक्क करणारी आहे. २०२१ मध्ये १२३ व्या स्थानावर असलेली रूपा, २०२२ मध्ये ४२ व्या, २०२३ मध्ये १२ व्या आणि आता २०२४ मध्ये थेट ५ व्या स्थानावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, ती आशियातील टॉप रँक खेळाडू आहे.4 / 7रूपाने चौथ्या वरिष्ठ राष्ट्रीय तायक्वांदो पूमसे चॅम्पियनशिपमध्ये 'रिकॉग्नाइज्ड इंडिव्हिज्युअल पूमसे U30' श्रेणीत सुवर्णपदक पटकावलं. 5 / 7यापूर्वी बंगळुरू येथील कोरामंगला स्टेडियमवर झालेल्या फायनल नॅशनल टीम ट्रायलमध्ये विजय मिळवून तिने भारतीय तायक्वांदो संघात आपलं स्थान निश्चित केलं होतं.6 / 7नुकत्याच दिल्लीतील हयात रीजन्सी येथे पार पडलेल्या 'इंडिया तायक्वांदो गाला अवॉर्ड्स २०२६' मध्ये रूपाला 'बेस्ट तायक्वांदो पूमसे प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.7 / 7अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी रूपा बायोरचं अभिनंदन केलं असून तिचं हे यश भारतीय तायक्वांदोसाठी एक ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचं म्हटलं आहे.