1 / 9'कॅन्सर' या आजाराचं नुसतं नाव (7 Indian Bollywood Actresses Who Battled Cancer With a Tough Smile) जरी घेतलं तरी फार भीती वाटते. कॅन्सरसारखा मोठा आजार कुणालाही होऊ शकतो. अगदी मोठं मोठाल्या बॉलिवूड अभिनेत्री, सेलेब्रिटी देखील या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराच्या विळख्यातून सुटल्या नाहीत. '2 / 9'कॅन्सर' हा कितीही मोठा आणि गंभीर आजार (7 actresses who battled cancer with a smile) वाटत असला तरीही काहीजणी अशा आहेत की त्यांनी या आजाराचा सामना करत, अतिशय धीराने लढा दिला आहे. 'कॅन्सर' सारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत ज्यांनी या आजाराला हरवले अशा काही सेलिब्रिटी अभिनेत्री पाहूयात.3 / 9बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची बायको आणि फिल्ममेकर असणाऱ्या ताहिरा कश्यप हिला देखील कॅन्सर झाला होता. २०१८ साली ताहिरा कश्यपला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. तिने हा प्रवास आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. ताहिराने कॅन्सरशी लढा देत ‘माय-एक्स ब्रेस्ट’ हे पॉडकास्टदेखील तयार केले होते. २०१९ जानेवारीपासून ताहिराने उपचाराला सुरुवात केली, याचबरोबर २०२० साली ती कॅन्सरमुक्त झाली असल्याचे तिने घोषित केले होते. 4 / 9परदेस, धडकन व लज्जा या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा चौधरी हिनेही २०२४ वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कॅन्सर झाला असल्याची माहिती दिली होती. 5 / 9मनीषा कोईराला यांना २०१२ साली गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांनी आपला पुढचा उपचार अमेरिकेतन जाऊन पूर्ण केला. नंतर त्यांनी ‘हिल्ड : हाऊ कॅन्सर गेव्ह मी अ न्यू लाइफ’ या पुस्तकात त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. 6 / 9बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने २०१८ साली मेटास्टॅटिक हाय-ग्रेड कॅन्सरच्या निदानाबद्दल खुलासा केला. अभिनेत्रीने आपला उपचार न्यूयॉर्कमध्ये पूर्ण केला. 7 / 9अभिनेत्री हीना खानने सोशल मीडियाद्वारे आपल्याला कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला असल्याची बातमी दिली होती. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करीत अभिनेत्रीने आपल्या आरोग्याबद्दल एक धक्कादायक पोस्ट शेअ केली. हीनाला स्तनाच्या कर्करोग झाला असल्याचे निदान झाले आहे. हा तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग आहे, असे देखील तिने संगितले.8 / 9बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांची पत्नी आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना २०२० साली ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. मल्टिपल मायलोमा हा ब्लड कॅन्सरचाच एक प्रकार आहे. कॅन्सरमुक्त झाल्यावर त्यांनी २०२२ साली 'इंडियाज गॉट टॅलेंट' या एका हिंदी रिऍलिटी शोमध्ये गायक बादशहा आणि शिल्पा शेट्टी यांच्या सोबत परीक्षक म्हणून जबाबदारी निभावली. 9 / 9शगुफ्ता अली या सुप्रसिद्ध बॉलीवूड आणि टीव्ही अभिनेत्री आहेत. नीना गुप्ता दिग्दर्शित 'सांस' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना स्टेज ३ स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी यावर केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया करुन या आजराशी लढा देत, या आजारावर मात केली.