Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ब्लड प्रेशरचा त्रास मागे लागला हे सांगणारी ३ लक्षणं, बघा BP वाढण्यामागची कारणं आणि उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2025 09:25 IST

1 / 8
बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली कमी वयातच अनेकांना ब्लड प्रेशर वाढण्याचा त्रास होतो आहे. रोजच्या कामाच्या धावपळीत तर अनेक जणांच्या हे लक्षातही येत नाही की त्यांच्या मागे बीपीचा त्रास सुरू झाला आहे.
2 / 8
पण रक्तदाबाची लक्षणं वेळीच ओळखून त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच औषधोपचार सुरू करणं कधीही उत्तम. मायोक्लिनिकने रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात कोणकोणते बदल दिसून येतात याविषयीची माहिती दिली आहे. तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर रक्तदाबाविषयी डॉक्टरांचा सल्ला घ्या..
3 / 8
सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे Shortness of breath. म्हणजेच श्वास खूप मोठ्याने घ्यावा लागणे. श्वास घेताना त्याचा आवाज येणे. लवकर दम लागणे.
4 / 8
रक्तदाबाचा त्रास सुरू झालेल्या काही लोकांना वारंवार डोकेदुखीचाही त्रास होतो.
5 / 8
नाकातून वारंवार रक्त येणं हे देखील ब्लड प्रेशर वाढल्याचं एक लक्षण असू शकतं.
6 / 8
American Heart Association यांनी दिलेल्या माहितीनुसार रक्तदाब वाढण्याचं कोणतंही असं ठराविक कारण नाही. त्यासाठी अनुवंशिकता, वय, जीवनशैली, आहार अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.
7 / 8
याविषयी तज्ज्ञ असंही सांगतात की ६५ ते ७८ टक्के केसेसमध्ये लठ्ठपणा हे देखील बीपीचे एक कारण आहे.
8 / 8
शारिरीक व्यायाम नसणे, सोडियम जास्त प्रमाणात घेणे, अल्कोहोल घेण्याची सवय, स्मोकिंग, अपुरी झोप तसेच काही आजारांवरची औषधं सातत्याने घेतल्यामुळेही बीपीचा त्रास होऊ शकतो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नव्यायाम