Join us   

World Heart Day 2022 : हार्ट अटॅकचे संकेत देतात साधी वाटणारी ४ लक्षणं; समजून घ्या बचावाचे उपाय, तब्येत राहील उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 11:51 AM

1 / 6
आजकाल जगभरात हृदयविकारामुळे अनेकांना जीव गमवावा आहे. पूर्वी ही प्रकरणे बहुतेक वृद्ध लोकांमध्ये दिसून येत होती. पण कोरोना महामारी (कोविड-19) नंतर सर्व वयोगटातील लोकांना या आजारांचा धोका उद्भवतोय. अशा स्थितीत ते टाळण्यासाठी उपाय जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक हृदय दिन 2022 देखील 29 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. (World heart day 2022) यंदाची थीम 'प्रत्येक हृदयासाठी तुमचे हृदय वापरा' अशी आहे.
2 / 6
हृदय रुग्णालय, पटनाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. राजन ठाकूर यांनी एनबीटीशी बोलताना सांगितले की,'हृदय हा शरीरातील सर्वात कठीण काम करणारा अवयव आहे. अशा स्थितीत ते कमकुवत होणे घातक ठरते. या कारणास्तव, जिममध्ये व्यायाम करताना किंवा नृत्य करताना लोक कार्डियाक अरेस्टचे बळी ठरतात. आपल्या दिनचर्येत, जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करून हृदयाशी संबंधित आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो. तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी पैशाने तुमचा आजार बरा होऊ शकत नाही.
3 / 6
१) हृदय दररोज सुमारे 2000 गॅलन रक्त पंप करते. २) हृदयाचा आकार प्रौढ व्यक्तीच्या मुठीएवढा असतो. ३) हृदय दररोज सुमारे एक लाख वेळा धडधडते. ४) हृदय मेंदू किंवा शरीराशिवाय कार्य करू शकते. ५) सरासरी, पुरुषाचे हृदय स्त्रीच्या हृदयापेक्षा 2 पट जास्त जड असते. ६) स्त्रीचे हृदय पुरुषाच्या हृदयापेक्षा थोडे अधिक वेगाने पंप होते. ७) सरासरी मानवी हृदय एका मिनिटात 72 ते 80 वेळा धडकते.
4 / 6
आहारात अधिक फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा, गव्हाच्या चपातीऐवजी बाजरीची भाकरी खा, अक्रोड, बदाम, सोयाबीन, फ्लेक्ससीड्स खा, भुकेपेक्षा 20% कमी अन्न खा, नियमित व्यायाम करा, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवा. दररोज आठ तास झोप घ्या.
5 / 6
छातीत अस्वस्थता आणि जडपणा, श्वासोच्छवासाची समस्या छातीत दुखते, छातीत जळजळ आणि वेदना, शरीरात सूज येणे ही लक्षणं दिसताच त्वरीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
6 / 6
डॉ. राजन ठाकूर सांगतात की हृदयविकाराच्या झटक्यातही वाचण्याची शक्यता आहे. तथापि, 90 टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने होतो. अशा स्थितीत, हृदयविकाराचा झटका आल्यास, रुग्णाने झोपावे आणि कपडे सैल करावे. आणि हृदयविकाराचा झटका आल्यास लगेच CPR द्यावा.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य