भाताशिवाय जेवणच जात नाही? रोज जास्त भात खाल्ल्यानं उद्भवतात हे ६ त्रास, प्रमाण चुकवू नका
Updated:January 20, 2025 18:44 IST2025-01-19T17:38:55+5:302025-01-20T18:44:37+5:30
Side Effects Of Eating Rice : रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्यानं तुमचं वजन वाढू शकतं आणि कायमचा लठ्ठपणा येऊ शकतो.

भारतातील बरेच लोक डाळीसोबत भात खाणं पसंत करतात. काही लोक भाताशिवाय जेवतचनाही. दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानं तब्येतीवर चांगला परिणाम होतो. पण तुम्हाला माहिती आहे का हेल्थ एक्सपर्ट्स रात्री भात न खाण्याचा सल्ला देतात. याचा तुमच्या तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.
रात्री भात खाल्ल्यानं गट्स हेल्थवर चुकीचा परिणाम होतो. रात्री भात खाल्ल्यानं पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. गॅस, एसिडीटीसारख्या समस्या उद्भवल्यास रात्रीच्यावेळी भात खाणं टाळायला हवं.
रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्यानं तुमचं वजन वाढू शकतं आणि कायमचा लठ्ठपणा येऊ शकतो.
लठ्ठपणा अनेक गंभीर आजारांना निमंत्रण दोतो. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भात खाणं टाळा.
ज्या लोकांना दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो. त्यांनी रात्रीच्या जेवणात तांदूळ खाणं टाळायला हवं.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते रात्री भात खाल्ल्यानं घशात त्रास होतो. ज्यामुळे सायनसची समस्या उद्भवू शकते.
डायबिटीक पेशंट्सनी भात जास्त खाल्ल्यास त्यांची ब्लड शुगर वाढू शकते. म्हणून रात्रीच्या जेवणात भात खाणं टाळायला हवं.