वयाच्या चाळिशी आली नाही तरी हाडांमधून कटकट आवाज येतो? ५ पदार्थ रोज खा, ठिसूळ हाडं होतील मजबूत

Updated:January 2, 2026 17:08 IST2026-01-02T17:03:57+5:302026-01-02T17:08:28+5:30

bone health: weak bones: joint cracking sounds : वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर आहार कसा असायला हवा जाणून घ्या.

वयाच्या चाळिशी आली नाही तरी हाडांमधून कटकट आवाज येतो? ५ पदार्थ रोज खा, ठिसूळ हाडं होतील मजबूत

वयाची चाळिशी ओलांडली की अनेकांची तक्रार असते. उठताना, बसताना किंवा जिने चढताना हाडांमधून कटकट आवाज येतो. काहींना गुडघे दुखीचा त्रास सतावतो तर काहींना पाठीत जडपणा जाणवतो. (bone health)

वयाच्या चाळिशी आली नाही तरी हाडांमधून कटकट आवाज येतो? ५ पदार्थ रोज खा, ठिसूळ हाडं होतील मजबूत

अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि हे वयामुळे असेल असं समजतो. पण चुकीचा आहार, कॅल्शियमची कमतरता, व्हिटॅमिन डी चा अभाव, सतत एकाच जागी बसून काम करणं आणि हालचाल न करणं यामुळे हाडे ठिसूळ होऊ लागतात. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर आहार कसा असायला हवा जाणून घ्या. (joint cracking sounds)

वयाच्या चाळिशी आली नाही तरी हाडांमधून कटकट आवाज येतो? ५ पदार्थ रोज खा, ठिसूळ हाडं होतील मजबूत

आहारात आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करायला हवा. दूध, ताक, दही किंवा पनीर खा. हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. रोजच्या आहारात हे पदार्थ खाल्ल्याने हाडांना बळ मिळते.

वयाच्या चाळिशी आली नाही तरी हाडांमधून कटकट आवाज येतो? ५ पदार्थ रोज खा, ठिसूळ हाडं होतील मजबूत

तीळ आणि शेंगदाण्यांचा आहारात समावेश करा. काळे तीळ हाडांसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. त्यामध्ये कॅल्शियमसोबत मॅग्नेशियम आणि झिंकही मिळते.

वयाच्या चाळिशी आली नाही तरी हाडांमधून कटकट आवाज येतो? ५ पदार्थ रोज खा, ठिसूळ हाडं होतील मजबूत

हिरव्या पालेभाज्यांचा आहारात खा. पालक, मेथी, शेवगा पाने यामध्ये कॅल्शियमसोबत अँटीऑक्सिडंट्स असतात. या भाज्या हाडांची सूज कमी करायला मदत करतात.

वयाच्या चाळिशी आली नाही तरी हाडांमधून कटकट आवाज येतो? ५ पदार्थ रोज खा, ठिसूळ हाडं होतील मजबूत

डाळी आणि कडधान्ये खा. यामध्ये आपण मूग, हरभरा, मसूर यामध्ये प्रथिने भरपूर असतात. हाडांसाठी प्रथिने खूप गरजेचे असतात. रोजच्या जेवणात डाळ किंवा उसळ असेल तर हाडांची झीज कमी होते.

वयाच्या चाळिशी आली नाही तरी हाडांमधून कटकट आवाज येतो? ५ पदार्थ रोज खा, ठिसूळ हाडं होतील मजबूत

आपल्या हाडांची झीज रोखण्यासाठी सूर्यप्रकाश देखील महत्त्वाचा आहे. योग्य आहार शरीराला मिळाला नाही तर कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही. त्यासाठी रोज सकाळी १५ ते २० मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. आहारात तूप, बदाम, अक्रोड खा.