रात्री ब्रा काढून झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर असते का? तब्येतीवर बरे वाईट काय परिणाम होतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 14:18 IST
1 / 6महिला आजही नाजूक भागांच्या त्रासाबद्दल कोणाशीही चर्चा करत नाही. कामाच्या गडबडीत स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष न दिल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Women health tips should women sleep wearing bra at night)2 / 6 दिवसभर घट्ट इनरवेअर्स घातल्यामुळे अनेकदा रॅशेज, खाजेचा त्रास उद्भवतो. रात्रीच्यावेळी इनरवेअर्स काढून झोपावं का? यामुळे शरीराला फायदे होतात का योग्य अयोग्य असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. 3 / 6डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर स्त्रिया रात्री ब्रा काढून किंवा घालून झोपतात तर दोन्ही बाबतीत शरीराला कोणतेही नुकसान होत नाही (Women Sleep Wearing Bra at Night). आतापर्यंत असे कोणतेही संशोधन समोर आलेले नाही की ब्रा न घालून झोपल्यानं स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो किंवा वाढतो. 4 / 6आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुमची ब्रा स्तनांवर घट्ट बसत नसेल. तर तुम्हाला वेदना आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. 5 / 6ब्रा खरेदी करताना तिचे फॅब्रिक, आकार आणि शरीराचा पोत याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. योग्य ब्रा खरेदी केल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वातही भर पडेल.6 / 6डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर तुमच्या स्तनाला सूज आली असेल किंवा निप्पलमध्ये पू येत असेल तर तुम्ही काही दिवस ब्रा घालू नये असे केल्याने, संसर्ग आणखी वाढू शकतो, ज्यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो. तुमची अस्वस्थता बरी झाल्यावर तुम्ही पुन्हा ब्रा घालू शकता. त्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही