1 / 7धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची, लक्ष्मीची आणि कुबेराची पूजा केली जाते आणि त्यांना धने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्याकडे कोणताही सण असला तरी त्या सणाच्या नैवेद्याचे खूप महत्त्व असते. कारण त्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे. 2 / 7आता धनत्रयोदशीच्या दिवशीही जो धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो तो देखील आयुर्वेदानुसार आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. धने आणि गूळ खाल्ल्याने शरीरास नेमके कोणते लाभ होतात याची माहिती डाॅक्टरांनी dr.nehakarandikarjoshi या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 3 / 7त्या सांगतात की मुत्रमार्गाचे कित्येक विकार कमी होण्यासाठी तसेच अंगातली उष्णता कमी करण्यासाठी धने खूप उपयुक्त ठरतात.4 / 7कित्येक महिलांना अंगावरून पांढरं पाणी जाण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीही धने गुणकारी ठरतात.5 / 7पचनक्रिया अधिक चांगली करून कॉन्स्टीपेशन, ॲसिडीटी, त्वचारोग असे त्रास कमी होण्यासही धने उपयुक्त आहेत. 6 / 7गूळ हा रक्तशुद्धी करणारा तसेच उर्जा देणारा आहे. याशिवायही गुळाचे कित्येक फायदे आहेतच.7 / 7जेव्हा गूळ आणि धने हे दोन्ही एकत्र करून खाल्ले जातात तेव्हा ते आपल्या शरीराचे श्रम कमी करून शरीराला आराम देण्यासाठी मदत करतात. म्हणूनच दिवाळीच्या आधी झालेली दगदग, धावपळ यामुळे शरीराला आलेला थकवा घालवायचा असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य खायलाच हवा.