कुठल्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं? पाहा आयुर्वेदिक सल्ला, वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार निवडा धातू...

Updated:June 4, 2025 19:11 IST2025-06-04T15:26:12+5:302025-06-04T19:11:05+5:30

Are you drinking the right water for your body type : Which Metal Is Best for Drinking Water Choose According to Your Dosha : Drink Water the Ayurvedic Way Best Metal Vessels for Your Dosha Balance : वात-पित्त-कफ दोषांनुसार, कोणी कोणत्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेशीर, ते पाहा...

कुठल्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं? पाहा आयुर्वेदिक सल्ला, वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार निवडा धातू...

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आणि त्यानुसार आहार, विहार, झोप व अगदी पाणी पिण्याचं भांडं देखील वेगळं असावं, असं आयुर्वेद (Which Metal Is Best for Drinking Water Choose According to Your Dosha) सांगतो. पाण्याचे गुणधर्म बदलण्यासाठी आणि ते शरीरात योग्य प्रकारे उपयोगी पडण्यासाठी ते कोणत्या धातूच्या भांड्यातून प्यावं, यालाही तितकंच महत्त्व आहे.

कुठल्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं? पाहा आयुर्वेदिक सल्ला, वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार निवडा धातू...

आयुर्वेदानुसार, व्यक्तीच्या वात, पित्त आणि कफ या तीन दोषांनुसार, पाणी नेमके कोणत्या ( Drink Water the Ayurvedic Way Best Metal Vessels for Your Dosha Balance) प्रकारच्या भांड्यातून प्यावे हे ठरवले जाते. प्रत्येक दोषाची प्रकृती वेगळी असते आणि त्या-त्या दोषाला संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या भांड्यातून पाणी पिण्याने अनेक फायदे मिळतात.

कुठल्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं? पाहा आयुर्वेदिक सल्ला, वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार निवडा धातू...

जर तुम्हाला वात आणि कफ दोष असेल तर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरेल. तांबं शरीरात उष्णता निर्माण करतं, जे वातदोषामुळे निर्माण होणाऱ्या थंडी, सांधेदुखी, कोरडेपणा यांवर उपयोगी ठरतं. वात आणि कफ दोष असलेल्या व्यक्तींनी रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी उठल्यावर पिणं फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला पित्त दोष असे तर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे.

कुठल्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं? पाहा आयुर्वेदिक सल्ला, वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार निवडा धातू...

चांदी ही मुळातच थंड प्रकृतीची असून शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते, त्यामुळे पित्तदोष संतुलित ठेवण्यासाठी नेहमी चांदीच्या भांड्यातून पाणी पिणे उपयुक्त ठरु शकते. ज्यांना वारंवार सर्दी व खोकला होतो अशा व्यक्तींनी चांदीच्या भांड्यातून कधीच पाणी पिऊ नये.

कुठल्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं? पाहा आयुर्वेदिक सल्ला, वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार निवडा धातू...

कांस्य धातू शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यात मदत करतात. याचबरोबर, पचन सुधारतात यामुळे शरीर हलकं वाटतं. वात आणि कफ दोष असणाऱ्यांनी सकाळी कोमट पाणी कांस्य धातूच्या भांड्यातून प्यावं. पित्त दोष असेल तर चुकूनही कांस्य धातूच्या भांड्यातून पाणी पिऊ नये.

कुठल्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं? पाहा आयुर्वेदिक सल्ला, वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार निवडा धातू...

मातीच्या भांड्यातून पाणी पिणे फार पूर्वीपासून आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांवर मातीच्या भांड्यातून पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. माती थंड गुणधर्माची असून शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.

कुठल्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणं फायद्याचं? पाहा आयुर्वेदिक सल्ला, वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार निवडा धातू...

५. नेहमीच काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यातून पाणी पिण्याऐवजी, आपली प्रकृती ओळखून वेगवेगळ्या धातूच्या भांड्यातून पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.