Join us

स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरणं जास्त चांगलं? लठ्ठपणा, हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 14:55 IST

1 / 6
तेलाचं आहारातलं वाढतं प्रमाण हा सध्या एक गंभीर प्रश्न झालेला आहे. कारण त्यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड वाढणे असे अनेक त्रास कित्येकांना कमी वयातच सुरू झाले आहेत.
2 / 6
त्यामुळेच स्वयंपाकात किती तेल वापरावं आणि कोणतं तेल असावं याबाबतची अचूक माहिती गृहिणींना नेहमीच हवी असते. याविषयीच माहिती सांगणारा एक व्हिडिओ डॉक्टरांनी foodpharmer या पेजवर शेअर केला आहे.
3 / 6
यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की स्वयंपाकात तेलाचा कमीत कमी वापर करावा. तसेच कोणताही पदार्थ करताना तेल खूप जास्त तापवू नये. कारण तेल जेवढे जास्त गरम होते, तेवढे त्याच्यातले विषारी घटक वाढत जातात.
4 / 6
एकदा पदार्थ तळून झाल्यानंतर कढईत उरलेले तेल वारंवार वापरणे टाळावे. कारण ते आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.
5 / 6
मोहरीचे तेल, खोबरेल तेल, तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरणे चांगले. हे तेल जर कच्च्या घाण्याचे असेल तर ते अधिक चांगले.
6 / 6
याशिवाय जिथे शक्य होईल तिथे तेलाऐवजी तुपाचा वापरही करावा. तूप वापरताना ते शक्यतो घरी तयार केलेले असावे. एकच एक प्रकारचे तेल सातत्याने खाऊ नये. तेल नेहमी बदलत राहावे.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नहृदयविकाराचा झटकाहृदयरोग