दिवसभरातील खाण्याच्या वेळा चुकवू नका! पाहा आयुर्वेदानुसार नेमकं कधी काय खावं - पोट बिघडणार नाही...

Updated:February 26, 2025 19:15 IST2025-02-26T19:03:57+5:302025-02-26T19:15:59+5:30

What are the best times to Eat food : What Is The Best Time For Breakfast To Dinner According To Ayurveda : Essential Ayurveda Rules for Food Consumption : What is the best time to eat food according to Ayurveda : Best time to eat Breakfast Lunch and Dinner as per Ayurveda :अनेकदा कामाचा ताण इतका असतो की इच्छा असूनही जेवणाच्या वेळा चुकतात, यासाठी कधी काय खावं ते पाहूयात.

दिवसभरातील खाण्याच्या वेळा चुकवू नका! पाहा आयुर्वेदानुसार नेमकं कधी काय खावं - पोट बिघडणार नाही...

दिवसभरात योग्य वेळी खाणे आपल्या आरोग्यासाठी (Best time to eat Breakfast Lunch and Dinner as per Ayurveda) खूप फायदेशीर असते. आयुर्वेदानुसार, जेवणाची योग्य वेळ केवळ आपल्या भूकेवर अवलंबून नसते, तर ती आपल्या शरीराच्या जैविक घड्याळावर (बॉडी क्लॉक) देखील परिणाम करते. योग्य वेळी योग्य प्रकारचे अन्न खाल्ल्याने आरोग्य सुधारतेच, शिवाय दिवसभर शरीर उत्साही राहते. आयुर्वेदानुसार, दिवसभरातील आपल्या खाण्याची योग्य वेळ कोणती असावी ते पाहूयात.

दिवसभरातील खाण्याच्या वेळा चुकवू नका! पाहा आयुर्वेदानुसार नेमकं कधी काय खावं - पोट बिघडणार नाही...

योग्य वेळेवर न जेवल्याने किंवा योग्य तो आहार न घेतल्याने त्याचा आपल्या पचनावर (What Is The Best Time For Breakfast To Dinner According To Ayurveda) अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो. योग्य वेळेवर जेवण न करणे, नाश्त्याच्या वेळा चुकवणे यांसारख्या सवयी चुकीच्या आहेतच, तसेच या चुकांचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो.

दिवसभरातील खाण्याच्या वेळा चुकवू नका! पाहा आयुर्वेदानुसार नेमकं कधी काय खावं - पोट बिघडणार नाही...

आयुर्वेदानुसार, सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत खाण्याची योग्य वेळ कोणती ते पाहूयात.

दिवसभरातील खाण्याच्या वेळा चुकवू नका! पाहा आयुर्वेदानुसार नेमकं कधी काय खावं - पोट बिघडणार नाही...

सकाळी पचनक्रिया मंद असते, म्हणून नाश्ता हलका आणि पोषक तत्वांनी समृद्ध असा असावा. त्यात ताजी फळे, सुकामेवा, दलिया किंवा तूप घालून बनवलेले हलके पदार्थ यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. खूप जड, तळलेले किंवा फ्रिजमधील थंड पदार्थ खाणे टाळावे.

दिवसभरातील खाण्याच्या वेळा चुकवू नका! पाहा आयुर्वेदानुसार नेमकं कधी काय खावं - पोट बिघडणार नाही...

आयुर्वेदानुसार, दुपारच्यावेळी पचनशक्ती सर्वात जास्त चांगली असते, ज्यामुळे शरीर पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेतात. यासाठीच तुमच्या दुपारच्या जेवणात डाळ, भात, रोटी, भाज्या आणि देशी तूप असा संतुलित आहार घ्या. प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त तळलेले पदार्थ टाळा.

दिवसभरातील खाण्याच्या वेळा चुकवू नका! पाहा आयुर्वेदानुसार नेमकं कधी काय खावं - पोट बिघडणार नाही...

संध्याकाळी हलका नाश्ता खाल्ल्याने रात्रीच्या जेवणापूर्वी जास्त भूक लागत नाही आणि पचन सुधारते. यावेळी फळे, भाजलेले मखाणे, सुकामेवा किंवा हर्बल टी घेणे फायदेशीर ठरते. शक्यतो पॅकेजिंग केलेले स्नॅक्स, खूप गोड किंवा तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

दिवसभरातील खाण्याच्या वेळा चुकवू नका! पाहा आयुर्वेदानुसार नेमकं कधी काय खावं - पोट बिघडणार नाही...

आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावते, त्यामुळे रात्री उशिरा जड जेवण केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. रात्रीच्या जेवणात डाळ, हलक्या भाज्या, खिचडी किंवा सूप असे अन्नपदार्थ खावेत. जास्त मसालेदार, पचायला जड आणि फ्रिजमधील थंड अन्नपदार्थ खाऊ नयेत.

दिवसभरातील खाण्याच्या वेळा चुकवू नका! पाहा आयुर्वेदानुसार नेमकं कधी काय खावं - पोट बिघडणार नाही...

झोपण्यापूर्वी जर तुम्हाला थोडी भूक लागली असेल तर कोमट हळदीचे दूध, हर्बल टी किंवा कोमट पाणी पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.