PCOS आहे, काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही? आहारतज्ज्ञ सांगतात, PCOS असेल तर खास उपाय
Updated:September 26, 2023 17:27 IST2023-09-26T17:18:00+5:302023-09-26T17:27:19+5:30

वजन कमी होतच नाही.... ही अनेक जणांची समस्या आहे. यासाठी अनेक जण नेहमीच वेगवेगळे व्यायाम करताना, डाएट प्लॅन फॉलो करताना दिसतात.
ज्यांना PCOS किंवा PCOD चा त्रास असतो, अशा मैत्रिणी तर वजन वाढीच्या समस्येने नेहमीच त्रस्त असतात. हा त्रास असेल तर वजन कमी होणारच नाही का, अशी एक भीतीही त्यांच्या मनात कायम असते.
म्हणूनच अशा सगळ्या जणींसाठी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी PCOS किंवा PCOD चा त्रास असेल तर वजन कमी कसं करायचं, याविषयी विशेष माहिती दिली आहे.
त्या म्हणतात की PCOS किंवा PCOD चा त्रास हा प्रामुख्याने इन्सुलिन रेझिस्टन्सशी निगडीत असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी शारिरीक हालचाल जास्त होईल, असे व्यायाम केले पाहिजेत.
म्हणून अशा व्यक्तींनी हृदयाची गती वाढविणारे व्यायाम करायला पाहिजेत.
यामध्ये रनिंग, जॉगिंग असे व्यायाम करू शकता.
नियमितपणे सायकलिंग केल्यानेही वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते.