Join us   

Virginity test : व्हर्जिनिटी टेस्ट आणि व्हर्जिनिटी शस्त्रक्रियांवर बंदी घालण्याची डॉक्टरांचीच मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 4:18 PM

1 / 8
वर्जिनिटी टेस्ट आणि रिपेअर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी ब्रिटनच्या डॉक्टरांनी या विषयाकडे आपला मोर्चा वळवला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत वर्जिनिट रिपेअर नावाचे खोटे ऑपरेशन्स बंद होणार नाहीत तोपर्यंत वर्जिनिटी टेस्टवर कायदा तयार करण्याचा काहीही उपयोग नाही.
2 / 8
रॉयल कॉलेज ऑफ ऑब्सस्ट्रीशियन्स एंड गायनॅकोलिस्टनं (RCOG) सरकारला इशारा देत वर्जिनिटी रिपेअर सर्जरीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान मागच्या महिन्यात खासदारांच्या समितीनं एक प्रस्ताव मांडला होता. त्यात काही खाजगी क्लिनिक्सद्वारे सुरू असलेल्या वर्जिनिटी टेस्टला गुन्हा ठरवण्याची मागणी केली होती.
3 / 8
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एकीकडे सरकार वर्जिनिटी टेस्टवर कायदा तयार करण्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे वर्जिनिटी रिस्टोर करत असलेल्या प्रक्रियांवर अद्याप बंदी घातलेली नाही. वर्जिनिटी रिपेअर सर्जरीमध्ये योनीच्या त्वचेची एक लेअर व्यवस्थित केली जाते. त्यामुळे हायमेन टुटल्याप्रमाणे दिसत नाही. या सर्जरीला हायमेनोप्लास्टी म्हणतात.
4 / 8
युकेमध्ये जास्तीत जास्त मुली आणि महिलांना व्हर्जिन दाखवण्यासाठी त्यांच्या आई वडिलांकडून किंवा नातेवाईकांकडून हायमेनोप्लास्टी केली जाते.
5 / 8
२०२० मध्ये संडे टाईम्सच्या तपासणीत २२ अशा प्रायव्हेट क्लिनिक्सचा खुलासा करण्यात आला जिथं व्हर्जिनिटी रिपेअर सर्जरीच्या नावावर मोठी रक्कम घेतली जात होती.
6 / 8
एका वर्षात जवळपास ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हायमेनोप्लास्टी आणि त्याच्याशी निगडीत माहिती गुगलवर शोधली.
7 / 8
रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टीट्रीशियन्स एंड गायनोकोलोजिस्टनं दिलेल्या माहितीनुसार वर्जिनिटी रिपेअर प्रक्रियेवर बंदी न घातल्यास वर्जिनिटी टेस्टिंग थांबवण्याच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग होणार नाही.
8 / 8
काही समाजामध्ये असा चुकीचा समज आहे की, पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवताना हायमेन ब्रेक होते. पण डॉक्टरांच्या मते या गोष्टीत काही तथ्य नाही. ब्रिटनचे कंजर्वेटिव खासदार रिचर्ड होल्डन यांनी कौमार्य चाचणीला बेकायदेशिर ठरवण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाला आरोग्य आणि सामाजिक विभागाकडून समर्थन मिळाल्यानंतर ब्रिटनच्या संसदेत प्रस्तृत करण्यात आले. या प्रस्तावात हायमेनोप्लास्टीवर प्रतिबंध लावण्याचाही समावेश आहे.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमहिला