हार्ट ॲटॅक येण्यापूर्वी काही दिवस दिसतात ही ७ लक्षणं; शरीरात होणारे बदल ओळखा-वेळीच धोका टाळा
Updated:August 16, 2024 15:15 IST2024-08-16T14:40:05+5:302024-08-16T15:15:37+5:30
Top 7 Heart Attack Symptoms Warning Signs : अटॅक येण्याच्या महिनाभर आधी कोणती लक्षणं ७ लक्षणं दिसतात ते समजून घेऊ

हार्ट अटॅक येण्याआधी काही वॉर्निंग साईन्सकडे लक्ष दिले तर हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवणं टाळता येऊ शकतं. हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी काही बेसिक गोष्टी माहित असाव्या लागतात. जर या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले तर धोका टाळता येऊ शकतो. अटॅक येण्याच्या महिनाभर आधी कोणती लक्षणं ७ लक्षणं दिसतात ते समजून घेऊ.
१) हार्ट अटॅक येण्याआधी काम न करता खूप थकवा येतो.
२) ३ ते ४ महिने आधी भूक कमी होते. जास्त जेवण जात नाही.
३) अनेकदा हार्ट अटॅक येण्याआधी दात आणि जबडे वेदना जाणवतात.
४) हार्ट अटॅक येण्याआधी डावा खांदा आणि पाठीतही वेदना जाणवतात.
5) हार्ट अटॅक येण्यासाठी झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
6) हार्ट अटॅक येण्याआधी शारीरिक कमकुवतणा आणि जास्त घाम येतो. ज्याामुळे चेहरा जास्त चिकट होतो.
7) पोट फुलणं, पोटात गॅस तयार होणं, एसिडीटी, यांसारख्या समस्यांमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.