1 / 7दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी आपण नेहमी ब्रश करतो. परंतु ब्रश करताना (Tips & Tricks Try These Home Remedies To Get Rid Of Bad Breath & Yellow Teeth Naturally) आपण काही गोष्टींकडे विषेश लक्ष देत नाही, ज्यामुळे दातांची योग्य सफाई होत नाही.2 / 7काहीवेळा आपण दात आणि तोंडाची योग्य पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी पूर्ण ५ मिनिटे ब्रश करतो. परंतु आपण स्वच्छतेसाठी ब्रश किती वेळ करतो हे महत्वाचे नसून आपण ते कसे आणि कोणत्या पद्धतीने करतो हे महतवाचे असते. 3 / 7१. दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी फक्त ३ मिनिटे ब्रश करणे इतका वेळ पुरेसा असतो. ३ मिनिटांपेक्षा जास्तवेळ ब्रश करू नये. तोंड फार मोठे न उघडता थोडेच उघडून ब्रश करावे. यामुळे ब्रश पूर्णपणे आत शेवटच्या दातापर्यंत पोहाचून योग्य पद्धतीने सफाई करतो. 4 / 7२. दात घासण्याचा ब्रश दर ३ महिन्यांनी बदला. एकच ब्रश ३ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी वापरु नका. कारण ब्रशच्या क्वालिटीवर देखील दातांची स्वच्छता अवलंबून असते. 5 / 7३. ब्रशने दात घासताना ते नेहमी सर्क्युलर मोशन मध्येच घासावे. वर - खाली, दोन दातांच्या मध्ये किंवा तोंडाच्या कोपऱ्यात सगळ्याच ठिकाणी गोलाकार सर्क्युलर मोशनमध्येच ब्रश फिरवावे. सर्क्युलर मोशन मध्ये दात घासल्याने दातांच्या फटीतील अडकलेले अन्नकण किंवा दातांवरील थर अगदी सहजपणे स्वच्छ करता येतात. 6 / 7 ४. दिवसांतून किमान दोन वेळा ब्रश करण्याची सवय ठेवावी. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी अशा दोन्ही वेळा ब्रश करावे. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे जमत नसेल तर किमान चूळ भरून किंवा गुळण्या करून दात आणि तोंडाची सफाई करावी. 7 / 7५. दात घासताना ते हलक्या हातांनीच घासले पाहिजेत आणि सर्व दात पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजेत. दात स्वच्छ करण्यासोबतच जीभही स्वच्छ करावी. तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जीभ साफ करणे देखील खूप महत्वाचे आहे.