Join us
Daily Top 2 Weekly Top 5

गार-गरम-गोड खाताच दाढ ठणकायला लागते, असह्य वेदना? ५ टिप्स- दाढदुखी टाळण्याचा पाहा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2025 17:04 IST

1 / 6
हिवाळ्यात थंड, गरम, गोड पदार्थ खाताच दात ठणकण्याचा त्रास खूप वाढतो. तो कमी करण्यासाठी या काही टिप्स नक्कीच उपयोगी ठरू शकतात...
2 / 6
ब्रश करणे हा दातांचं आरोग्य जपण्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. काही लोकांचा असा समज असतो की जोरात दात घासले तर ते जास्त स्वच्छ होतात. पण ते चुकीचं आहे. दात स्वच्छ करण्यासाठी नेहमी सॉफ्ट ब्रिसल्सचा ब्रश वापरा आणि हळूवारपणे दात स्वच्छ करा.
3 / 6
योग्य टुथपेस्ट निवडा. डेंटिस्टकडे जाऊन त्यांनी सुचवलेल्या मेडिकेटेड टुथपेस्टने दात घासणे अधिक चांगले.
4 / 6
थंडीच्या दिवसांत दात कुडकुडतात. यामुळेही ते जास्त संवेदनशील बनतात. त्यामुळे थंडी वाजून दात कडकडणार नाहीत याची काळजी घ्या. स्वेटर, स्कार्फ, मफलर असे उबदार कपडे वापरा.
5 / 6
रोज एक लवंग दुखऱ्या दाढांनी बारीक चावून खा किंवा लवंगचं तेल दाढांना लावा.
6 / 6
दर ६ महिन्यांनी डेंस्टिस्टचा सल्ला घ्यायला विसरू नका. यामुळे दाताच्या तक्रारी वेळीच कमी होतील.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स