Join us

बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात 'या' भाज्या, हार्ट ॲटॅकचा धोका टाळा-करा सोपा आहार बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:56 IST

1 / 7
Vegetable For Bad Cholesterol : हाय कोलेस्टेरॉल सध्या एक मोठी समस्या बनलं आहे. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात एक म्हणजे गुड कोलेस्टेरॉल आणि दुसरं म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल. शरीरात जर गुड कोलेस्टेरॉल कमी होऊन बॅड कोलेस्टेरॉल हाय झालं म्हणजे वाढलं तर हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका खूप जास्त वाढतो. कारण वाढलेलं कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं. ज्यामुळे हृदयापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. मेंदू आणि हृदयाला पुरेसं रक्त मिळालं नाही तर हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोक येतो. अशात तुम्ही कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही भाज्यांचं सेवन करू शकता. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, काही भाज्या कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. अशाच काही फायदेशीर भाज्यांबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
2 / 7
पत्ताकोबीची भाजी भरपूर लोक आवडीनं खातात. बरेच लोक तर ही भाजी जेवणाता कच्चीही खातात. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे रक्तवाहिन्यांमधील सूज आणि ऑक्सीडेटिव डॅमेज कमी करून कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतात. पत्ताकोबीतील फायबर पचन तंत्रातील कोलेस्टेरॉल आणि पित्तासोबत जुळतं, ज्यामुळे रक्तात त्याचं अवशोषण होणं रोखलं जातं.
3 / 7
वांग्यांमध्ये डायटरी फायबर असतं जे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. यातील फायबर आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचं अवशोषण हळुवार करतं. ज्यामुळे कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. वांग्यांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात जे रक्तवाहिन्या डॅमेज होण्यापासून बचाव करतात.
4 / 7
गाजरामध्येही डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे आतड्यांमध्ये कोलेस्टेरॉल अवशोषण कमी करतं. गाजरामधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि बीटा-कॅरोटीनने धमण्यांमधील ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी होते. नियमितपणे गाजर खाल तर कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.
5 / 7
भेंडीमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. भेंडीमध्ये म्यूसिलेजही असतं, जो एक जेलसारखा पदार्थ आहे. याने शरीरातील विषारी पदार्थ आणि कोलेस्टेरॉल बाहेर पडतं. भेंडी नियमितपणे खाल केलं तर शरीरात गुड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं.
6 / 7
ब्रोकलीमध्ये सुद्धा असे अनेक पोषक तत्व असतात, जे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, सोबतच फायटोकेमिकल्स असतात जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
7 / 7
पालक नियमितपणे खाल्ल्यास केल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते. पालकामुळे धमण्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्टेरॉल बाहेर निघतं. रोज पालक खाल्ल्यास हृदयाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.
टॅग्स : हृदयविकाराचा झटकाहृदयरोगहेल्थ टिप्स