फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

Updated:April 6, 2026 20:05 IST2026-04-06T20:00:10+5:302026-04-06T20:05:01+5:30

symptoms of damaged heart valve : warning signs of heart valve disease : हृदयाचे व्हॉल्व्ह खराब झाल्याची विशेष लक्षणं कोणती ते पाहा...

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

हृदयरोगाचा विचार करताना शक्यतो 'हार्ट अटॅक' बद्दलच जास्त चर्चा केली जाते, परंतु हृदयाच्या व्हॉल्व्हविषयी (Heart Valves) अजूनही पुरेशी जागरूकता नाही. खरं तर, आपल्या हृदयाचे (heart valve disease causes) व्हॉल्व्ह एखाद्या 'दरवाजा' प्रमाणेच काम करतात. रक्ताचा प्रवाह योग्य दिशेने व्हावा आणि तो उलट्या दिशेला फिरू नये, हे या व्हॉल्व्हचे मुख्य कार्य असते.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

हृदयामध्ये एकूण चार प्रकारचे व्हॉल्व्ह असतात. जर या व्हॉल्व्हनी त्यांचे काम नीट केले नाही, तर काही वेळा ते बदलण्याची (Valve Replacement) वेळ येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, हृदयाचे व्हॉल्व्ह एकाएकी खराब होत नाहीत; त्या हळूहळू 'लीक' होऊ लागतात किंवा कडक होतात. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त कष्ट करावे लागतात. वेळेवर उपचार मिळण्यासाठी या आजाराची लक्षणे सुरुवातीलाच ओळखणे अत्यंत गरजेचे असते. या लक्षणांची अधिक सविस्तर माहिती जयपूर येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी कन्सल्टंट डॉ. अंशुल कुमार गुप्ता यांनी एका संकेतस्थळाला दिली आहे.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

डॉ. अंशुल यांच्या मते, जर हृदयाचे व्हॉल्व्ह योग्य पद्धतीने काम करत नसतील, तर रक्ताचा प्रवाह उलट्या दिशेला वाहू लागतो. यामुळे शरीरात विविध प्रकारची लक्षणे दिसू लागतात.'क्लीव्हलँड क्लिनिक' (Cleveland Clinic) मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हृदयाचे व्हॉल्व्ह खराब झाल्याची विशेष लक्षणं कोणती ते पाहूयात.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

जर पायऱ्या चढल्यानंतरच लगेच धाप लागून श्वास फुलत असेल किंवा झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर याचा अर्थ असा की, हृदयावर दाब पडत आहे. हृदयाचे व्हॉल्व्ह नीट काम करत नसल्याचे हे एक मुख्य लक्षण असू शकते.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

जर तुम्हाला छातीमध्ये आवळल्यासारखे किंवा वजन ठेवल्यासारखे वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक वेळी छातीत तीव्र वेदना होतीलच असे नाही, त्यामुळे केवळ जडपणा जाणवला तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः चालताना किंवा कोणतीही हालचाल करताना जर हा जडपणा किंवा वेदना जाणवत असतील, तर त्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

जर तुमची झोप पूर्ण झाली असेल, तरीही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर याचा अर्थ असा की, तुमच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. जेव्हा हृदयाचे व्हॉल्व्ह योग्य पद्धतीने काम करत नाहीत, तेव्हा रक्ताभिसरण विस्कळीत होते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे विनाकारण येणाऱ्या या थकव्याकडे दुर्लक्ष करू नका.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

जर हृदयाचे ठोके अचानक वाढू लागले, खूप कमी झाले किंवा कमी - जास्त होत असतील, तर हे हृदयाच्या व्हॉल्व्हवर (Valves) ताण पडत असल्याचे लक्षण असू शकते. हृदयाच्या ठोक्यांमधील असा कोणताही असमतोल जाणवल्यास लागेच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

जर डोकं अचानक फिरू लागल, वारंवार चक्कर येऊ लागली किंवा स्वतःला अस्वस्थ वाटत असेल, तर याचा अर्थ असा असू शकतो की मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा योग्य पद्धतीने होत नाहीये. जर अशी स्थिती वारंवार जाणवत असेल, तर उशीर न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

अनेकजण पाय किंवा घोट्यांना येणारी सूज किरकोळ समजून दुर्लक्ष करतात. मात्र, जर हृदय योग्य पद्धतीने रक्त पंप करत नसेल, तर शरीरात पाणी साचू लागते. प्रामुख्याने हे पाणी पाय, पायाचे घोटे किंवा पोटाच्या भागात जमा होऊ लागते आणि त्यामुळे तिथली सूज एकदम वाढू लागते. अशा प्रकारची सूज हे हृदयाचे व्हॉल्व्ह नीट काम करत नसल्याचे एक महत्त्वाचा संकेत असू शकते.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात...

जर कोणाच वजन अवघ्या एक - दोन दिवसांतच एक ते दोन किलोने वाढले, तर ती शरीरातील चरबी नसते. हे प्रामुख्याने शरीरात पाणी साचल्याचे (Water Retention) लक्षण असते. जेव्हा हृदयाचे व्हॉल्व्ह नीट काम करत नाहीत, तेव्हा शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर न पडता साचून राहते. ही स्थिती अत्यंत गंभीर असू शकते, त्यामुळे अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण गरजेचं आहे.