हिमोग्लोबिन वाढवणारे ५ पदार्थ, रोज खा अशक्तपणा कमी होऊन वाढेल ताकद

Updated:March 20, 2026 14:22 IST2026-03-20T14:10:37+5:302026-03-20T14:22:48+5:30

हिमोग्लोबिन वाढवणारे ५ पदार्थ, रोज खा अशक्तपणा कमी होऊन वाढेल ताकद

काही जणांचं हिमोग्लोबिन नेहमीच खूप कमी असतं. त्यात महिलांचं प्रमाण तर खूप जास्त आहे.

हिमोग्लोबिन वाढवणारे ५ पदार्थ, रोज खा अशक्तपणा कमी होऊन वाढेल ताकद

हिमोग्लोबिन कमी असेल तर अशक्तपणा येतो. थोडेही शारिरीक श्रम सहन होत नाहीत. लगेचच गळून गेल्यासारखं वाटतं. हा सगळा त्रास टाळून हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर काही पदार्थ आपल्या आहारात असायलाच हवेत.

हिमोग्लोबिन वाढवणारे ५ पदार्थ, रोज खा अशक्तपणा कमी होऊन वाढेल ताकद

ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉ. स्नेहल यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यापैकी पहिला पदार्थ आहे काळ्या मनुका. रोज रात्री झोपण्यापुर्वी थोड्याशा पाण्यात ७ ते ८ मनुका भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बारीक चावून खा. हिमोग्लोबिन वाढेल.

हिमोग्लोबिन वाढवणारे ५ पदार्थ, रोज खा अशक्तपणा कमी होऊन वाढेल ताकद

रोज १ खजूर नियमितपणे खाल्ल्यासही हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. खजुरातून नॅचरल शुगर मिळत असल्याने एनर्जी लेव्हलही खूप वाढते.

हिमोग्लोबिन वाढवणारे ५ पदार्थ, रोज खा अशक्तपणा कमी होऊन वाढेल ताकद

तिसरा पदार्थ म्हणजे भाजलेले तीळ किंवा फुटाणे गुळासोबत खाणे. गूळ आणि फुटाणे हे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठीचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.

हिमोग्लोबिन वाढवणारे ५ पदार्थ, रोज खा अशक्तपणा कमी होऊन वाढेल ताकद

पालक, बीटरुट, शेवगा या भाज्याही नियमितपणे तुमच्या आहारात असू द्या. या भाज्यांचे वेगवेगळे पदार्थ करून खा. त्यातुनही तुमच्या शरीराची हिमोग्लोबिनची गरज पुर्ण होऊ शकेल.

हिमोग्लोबिन वाढवणारे ५ पदार्थ, रोज खा अशक्तपणा कमी होऊन वाढेल ताकद

हिमोग्लोबिन कमी असेल तर आवळाही नियमितपणे खा. कारण आवळ्यामध्ये असणारं व्हिटॅमिन सी अन्नपदार्थांमधून मिळणारं लोह शरीरात व्यवस्थित शोषून घेण्यास मदत करतं.