घट्ट ब्रा घालण्याने होतात गंभीर आजार, पाहा ‘ही’ ४ लक्षणं; वेळीच निवडा योग्य मापाची ब्रा...
Updated:May 10, 2025 13:01 IST2025-05-10T12:15:41+5:302025-05-10T13:01:47+5:30
Signs Your Bra Is Too Tight & How To Fix It Doctor Tells : 4 Signs Your Bra Is Definitely Too Tight : How to know if your bra is too tight : 4 Clear Signs That Your Bra Doesn't Fit You : शरीरात दिसणारे 'हे' ४ बदल तुमची ब्रेसियर घट्ट असल्याचे सांगतात, हे बदल कोणते ते पाहा...

टाईट ब्रा घातल्याने ढिले पडलेले स्तन आणि त्यांचा आकार व्यवस्थित दिसतो, यासाठीच अनेकजणी टाईट ब्रा (4 Signs Your Bra Is Definitely Too Tight) घालतात. टाईट किंवा प्रमाणापेक्षा घट्ट ब्रा घालणे फक्त स्तनांसाठीच (4 Clear Signs That Your Bra Doesn't Fit You) नाही तर शरीराच्या इतर भागांसाठी देखील हानिकारक असू शकते.
घट्ट ब्रा घातल्याने तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक (How to know if your bra is too tight) समस्या उद्भवू शकतात. आपला शरीरात दिसणारे 'हे' ४ मुख्य बदल तुमची ब्रेसियर घट्ट असल्याचे सांगतात, हे बदल नेमके कोणते ते पाहूयात...
१. छाती आणि कंबरदुखी :-
जर आपण खूप घट्ट ब्रा नेहमी वापरत असाल तर त्याचा आपल्या छाती आणि कंबरेवरही परिणाम होऊ शकतो. घट्ट ब्रा घातल्याने छातीवर दाब पडतो, ज्यामुळे छातीत जडपणा आणि सतत अंगाभोवती काहीतरी घट्ट बांधून ठेवल्यासारखे वाटते. जेव्हा ब्रा खूप घट्ट असते तेव्हा छातीवर एक प्रकारचा दबाव येतो, यावरून ओळखावे की तुम्ही खूप घट्ट ब्रा घातली आहे.
२. स्तनांकडील भागात खाज येणे :-
जर तुम्ही खूप घट्ट ब्रा घातली असेल तर त्यामुळे स्तनाभोवती खाज सुटणे, पुरळ येणे आणि जळजळ होणे अशा समस्या सतावतात. खरंतर, जेव्हा ब्रा खूप घट्ट असते तेव्हा स्तनांकडील भागात जास्त घाम येतो, ज्यामुळे त्यात भागात अधिक जास्त प्रमाणांत घाम आणि ओलावा साचून राहतो. यामुळे स्तनांकडील भागात खाज सुटणे याशिवाय फोड येण्याची समस्या सतावू शकते.
३. अॅलर्जी होणे :-
जर तुम्हाला वारंवार अॅलर्जीचा त्रास होत असेल, तर तुम्ही समजू शकता की तुम्ही खूप घट्ट ब्रा वापरत आहात. यासाठी घट्ट ब्रा न वापरता आपल्या मापानुसार योग्य ब्रा ची निवड करावी. परफेक्ट फिटिंगची आणि आरामदायी ब्रा घातल्याने तुमची अॅलर्जीची समस्या दूर होऊ शकते. खरंतर, कधीकधी हानिकारक रसायने असलेल्या डिटर्जंट आणि साबणांनी ब्रा धुण्यामुळे देखील अॅलर्जी होऊ शकते. जर तुम्हाला अॅलर्जी होत असेल तर तुम्ही तुमची ब्रा बदलावी किंवा सैल ब्रा घालायला सुरुवात करावी.
४. मान आणि खांद्यात वेदना होणे :-
मान आणि खांद्यामध्ये वेदना होण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु कधीकधी खूप घट्ट ब्रा घातल्याने देखील तुमच्या मान आणि खांद्यामध्ये वेदना होऊ शकतात. सहसा, अशा परिस्थितीत, तुम्हाला मान आणि खांद्यात जडपणा जाणवू लागतो आणि प्रभावित भागाच्या स्नायूंमध्ये वेदना होतात. अशावेळी सैल ब्रा घालावी.