1 / 7कोणताही आजार एकदम होत नसतो. त्या आजाराची काही लक्षणं आधी आपल्या शरीरात दिसायला लागलेली असतात. पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होत असतं. 2 / 7असंच काहीसं मधुमेहाचंही असतं. मधुमेह एकदम होत नाही. शरीरातली साखर वाढायला सुरुवात झाली की काही लक्षणं दिसू लागतात. ती वेळीच ओळखून साखर खाणं नियंत्रित ठेवायला हवं. अन्यथा काही दिवसांतच मधुमेह होऊ शकताे. ती लक्षणं नेमकी कोणती याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी monaaslam या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.3 / 7यातलं पहिलं लक्षण म्हणजे वारंवार लघवीला जावं लागणं. कारण तुमच्या शरीरात जास्त झालेली साखर शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी किडन्यांना जास्तीचं काम करावं लागतं. आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं.4 / 7लघवी जास्त प्रमाणात झाली तर शरीरातली पाणी पातळी कमी होते. त्याचा परिणाम म्हणजे वारंवार तहान लागते. सारखं पाणी प्यावं वाटतं.5 / 7खूप भूक लागणं. शरीरातली साखर वाढली की सारखे क्रेव्हिंग्स होतात. अन्न पोटात गेलं की खूप लवकर इन्सुलिन वाढतं आणि पुन्हा तेवढंच वेगात खाली येतं. त्यामुळे पुन्हा क्रेव्हिंग सुरू होतं आणि भुकेचं प्रमाण वाढतं.6 / 7जेव्हा शरीरातली साखर वाढते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या विचारशक्तीवरही होतो. मन एकाग्र होत नाही. डोकं जड पडल्यासारखं होतं आणि विसराळूपणा वाढायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टीही चटकन आठवत नाहीत.7 / 7शरीरातली साखर वाढली की त्याचा परिणाम त्वचेवरही होतो. मान, काखेचा भाग काळे पडू लागतात. स्किन टॅनिंगचं प्रमाण वाढायला लागतं.