1 / 8शरीरातील कोलेस्टेरॉल वाढणे ही गंभीर समस्या आहे. रक्तवाहिन्यांमध्ये मेणासारखा आढळणारा हा पदार्थ आहे. जर याचे प्रमाण वाढले तर हृदयरोग, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि इतर अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (cholesterol warning signs)2 / 8कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर आपल्या शरीरातच नाही तर डोळ्यांमध्ये देखील काही लक्षणे दिसतात. अशावेळी आपल्याला आरोग्याची काळजी तर घ्यावी तसेच आहारात देखील बदल करावा लागेल. (prevent heart attack with diet)3 / 8आपल्या पापण्यांवर किंवा त्यांच्या जवळ मऊ, पिवळसर, गुळगुळीत चरबीसारखे ठिपके दिसतात. हे शरीरातील वाढलेल्या कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे लक्षण आहे. 4 / 8डोळ्यांच्या कॉर्नियावर हलका पांढरा, राखाडी किंवा निळा थर तयार होतो. हे चरबी जमा झाल्यामुळे होते. जर कमी वयातच ही लक्षणे दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 5 / 8डोळ्यांच्या रेटिनाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होतो. यामुळे अचानक आपल्याला धुसर दिसू लागते. हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे. 6 / 8कोलेस्टेरॉलमुळे रक्ताभिसरणामुळे डोळ्यांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. ज्यामुळे दृष्टी कोरडी आणि अंधुक होऊ शकते. पापण्यांवर पिवळे डाग, डोळ्यांच्या बाहुलीभोवती पांढरे, निळे वर्तुळे, अचानक दृष्टी कमी होणे, डोळ्यांमध्ये सतत कोरडेपणा येणे यांसारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना भेटा. 7 / 8आपण आहारात लसूण किंवा अळशी खाल्ली तर शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. तसेच आहारात आपण दही, ओट्स किंवा स्मूदीमध्ये मिसळून घेऊ शकता. 8 / 8टोफू, सोया मिल्क आणि एडामामेसारखे संपूर्ण सोया असणारे पदार्थ एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करु शकतात. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.