Join us   

Sidharth Shukla : तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; वर्षातून एकदातरी 'या' टेस्ट करा, तरच होईल बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 12:15 PM

1 / 8
वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं (Sidharth Shukla) जगाचा निरोप घेतला. कूपर रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला. या वयात शरीरात हार्मोन्सपासून्सपासून मासपेशींपर्यंत अनेक बदल होत जातात. म्हणून वयाची तीशी, चाळीशी पार केल्यानंतर काही टेस्ट करणं गरजेचं असतं जेणेकरून गंभीर आजार टाळता येऊ शकतात.
2 / 8
कोलेस्टेरॉल चाचणीद्वारे हृदयाच्या आरोग्याची स्थिती कळते. या चाचणीमध्ये एचडीएलचे आकार आणि त्यांचे कण निश्चित केले जातात. ही चाचणी सहसा कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, एचडीएल, एचलडीएल आणि कोलेस्टेरॉल/एचडीएल गुणोत्तर तपासते.
3 / 8
एचडीएलला हाय डेंसिटी लिपोप्रोटीन म्हणतात. त्याची कमतरता हृदयरोगाचा धोका वाढवते. जर चाचणीमध्ये HDL कोलेस्टेरॉलची पातळी 60 mg/dl पेक्षा जास्त असेल तर हृदयरोगाचा धोका कमी असतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीचा एचडीएल स्तर 40 mg/dl पेक्षा कमी असेल तर हृदयरोगाची शक्यता वाढते.
4 / 8
वयाच्या चाळीशीनंतर नियमित स्वरूपात आपली ब्लड शुगर लेव्हल तपासत राहायला हवी. ४० ते ५० मध्ये हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेंशनचा धोका असतो. त्यामुळे कोरोनरी धमन्यांवर परिणाम होतो. अशा स्थितीत हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. म्हणूनच या आजाराला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. सुरूवातीला या आजाराची तीव्र लक्षणं दिसून येत नाहीत. म्हणून वेळोवेळी ब्लड प्रेशर स्क्रिनिंग टेस्ट करायला हवी.
5 / 8
संपूर्ण रक्ताची गणना आपल्या अनेक अवयवांच्या आरोग्याबद्दल सांगते, म्हणून ही एक महत्त्वाची चाचणी आहे. संपूर्ण रक्त गणना चाचणीद्वारे, आपल्याला यकृत, हृदय आणि किडनीबद्दल माहिती मिळते. या चाचणीमध्ये व्यक्तीच्या रक्तात असलेल्या पेशींची तपासणी केली जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या रक्तात कमी किंवा जास्त रक्तपेशी असतील तर त्याला आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात.
6 / 8
या टेस्टला टॉलरेंस टेस्ट असंसुद्धा म्हटलं जातं. या टेस्टवरून कळतं की तुमच्या शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत आहे की नाही. काही लोकांना व्यायाम करताना हृदयाचे ठोके अनियमित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. या तपासणीत थकवा, हृदयाची गती, ब्लड प्रेशर आणि एक्सरसाईज करताना हार्ट एक्टिव्हिटीची तपासणी केली जाते. जर तुम्हाला छातीत दुखणं, थकवा येणं, श्वास घ्यायला त्रास होणं असा त्रास होत असेल तर या चाचण्या जरूर करून घ्या.
7 / 8
वाढत्या वयात तुमचे डोळेसुद्धा कमकुवत होऊ लागतात. ४० नंतर डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. जर तुम्ही चष्मा किंवा लेंस वापरत असाल तर रेग्यूलर डोळ्याची तपासणी करून घ्यायला हवी. यामुळे मोतीबिंदू, ग्लूकोमाची माहिती मिळू शकते. जर तुम्हाला डायबिटीस किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर चाचणी जरूर करायला हवी.
8 / 8
४० ते ५० वयात डॉक्टर वर्षातून एकदा कोलोनोस्कोपी करण्याचा सल्ला देतात. कुटुंबात कोलोन कॅन्सरचा इतिहास असल्यास किंवा तुम्ही इंफ्लामेट्री बाउल डिसऑर्डरचा सामना करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्ल्यानं ही चाचणी करून घ्यायला हवी.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहृदयविकाराचा झटकाहृदयरोगसिद्धार्थ शुक्ला