1 / 7उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी कलिंगडपेक्षा चांगले फळ दुसरे कोणतेच नाही. ९० टक्क्यांहून अधिक पाणी आणि नैसर्गिक साखरेने समृद्ध असलेले हे फळ आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. पण अनेकदा चवीच्या नादात किंवा घाईघाईत कलिंगड चुकीच्या पदार्थांसोबत खातो, ज्यामुळे आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते.(Watermelon causing acidity and bloating) 2 / 7आयुर्वेदानुसार, कलिंगड थंड असतो आणि ते पचायला थोडे जड असू शकते. कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच विशिष्ट पदार्थांचे सेवन केले, तर त्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. यामुळे अपचनच नाही, तर पोट फुगणे, मळमळ होणे आणि तीव्र ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो. चुकीच्या आहार पद्धतीमुळे शरीरातील अग्नी मंदावतो, परिणामी अन्नाचे पचन नीट होत नाही. त्यासाठी कलिंगड खाताना कोणते पदार्थ खाऊ नये पाहूया. (Best time to eat watermelon for digestion)3 / 7कलिंगडमध्ये आधीच भरपूर पाणी असते. ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनमार्गातील पाचक रसांची तीव्रता कमी होऊ लागते. यामुळे अन्नाचे पचन मंदावते आणि गॅस किंवा जुलाब होण्याचा धोका वाढतो. 4 / 7कलिंगड हे फळ आम्लयुक्त आहे. कलिंगड आणि दूध एकत्र आल्यास पोटात नीट पचत नाही. ज्यामुळे गॅस, पित्त आणि उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो. कलिंगड खाल्ल्यानंतर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणं टाळा. 5 / 7अंडी किंवा तळलेल्या पदार्थांमध्ये फॅट्स आणि प्रोटीन्स जास्त असतात. कलिंगड हे थंड आणि रसाळ फळ असल्यामुळे या गरम पदार्थांसोबत खाल्ल्याने पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो. ज्यामुळे पोटात जडपणा जाणवतो आणि मळमळ सुरु होते. 6 / 7अनेकांना कलिंगडवर मीठ टाकून खाण्याची सवय असते. पण मीठ टाकल्यामुळे कलिंगडतील पोषक तत्वे शोषून घेण्याची शरीराची क्षमता कमी होते आणि शरीरात वॉटर रिटेंशनचा त्रास होऊ लागतो. 7 / 7कलिंगड नेहमी दिवसा किंवा दुपारी खावे. रात्री कलिंगड खाणे टाळावे, कारण यामुळे पचन मंदावते आणि सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.