डायबिटिस असेल तर ‘ही’ ५ फळं कायमची विसरुन जा, रक्तातील शुगर वाढवणाऱ्या फळांना बाय म्हणा...
Updated:February 13, 2025 20:08 IST2025-02-13T20:04:56+5:302025-02-13T20:08:21+5:30
high blood sugar symptoms: diabetes: diabetes food to avoid: should diabetics avoid fruits: blood sugar diabetes: diabetes symptoms : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, झोप पूर्ण न होणे आणि सतत ताण घेतल्यामुळे अगदी लहान वयात मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, झोप पूर्ण न होणे आणि सतत ताण घेतल्यामुळे अगदी लहान वयात मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो. (high blood sugar symptoms)
मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आरोग्याची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी लागते. कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी त्यांना अनेकदा विचार करावा लागतो. (should diabetics avoid fruits)
रक्तातील साखर वाढेल का, असा प्रश्न त्यांना वारंवार सतावत असतो. परंतु, काही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास शरीरातील शुगर लेव्हल वाढू शकतो.
त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही या ५ फळांचे सेवन करु नका.
लिचीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. एकापेक्षा जास्त प्रमाणात लिचीचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते.
आंबा तुम्हाला कितीही आवडत असला तरी तो खाऊ नका. यामुळे शरीरातील नैसर्गिक साखरेची पातळी वाढते. कमी प्रमाणात खाल्ल्याने साखरेची पातळी स्थिर राहिल.
अननसमध्ये फायबर आणि पोषक तत्व आहे. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढते.
द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर अधिक असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढून आरोग्याला हानी होते.
कलिंगडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना कलिंगड न खाण्याचा सल्ला दिला जातो.