1 / 6मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी सगळ्यात अवघड ठरणारी गोष्ट म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे.2 / 6त्यासाठी आहार, व्यायाम आणि नियमितपणे औषधी घेणं खूप गरजेचं आहे. या तीन गोष्टी सांभाळल्या तर निश्चितच रक्तातील साखर नियंत्रित राहू शकते.3 / 6तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी आणखी एक विशेष सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे. 4 / 6त्या म्हणतात की मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी असे व्यायाम करण्यावर भर द्यायला हवा ज्यातून त्यांच्या पायांची स्ट्रेन्थ वाढू शकते.5 / 6स्क्वॅट्स, लंजेस, सायकलिंग, रनिंग असे पायाची ताकद वाढविणारे वेगवेगळे व्यायाम म्हणजे मधुमेहींसाठी गेम चेंजर ठरतात. कारण त्यामुळे त्यांची रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. 6 / 6पण त्या व्यायामासोबतच आहारावरही नियंत्रण हवे. डाॅक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुमचा आहार नियमितपणे घ्यावा. आणि पॅकबंद पदार्थ कटाक्षाने टाळावे.