1 / 7बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची करतरता असते. खरंतर शाकाहारी पदार्थांमध्येही चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. पण आपण ते योग्य पद्धतीने खात नाही, म्हणून प्राेटीन्स मिळविण्यासाठी त्यांचा म्हणावा तसा उपयोग होत नाही.2 / 7म्हणूनच आहारतज्ज्ञांनी भरपूर प्रोटीन्स देणारे काही फूड कॉम्बिनेशन्स gunjanshouts या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. हे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून निघण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.3 / 7यापैकी पहिला पदार्थ आहे बदाम. १० भिजवलेले बदाम आणि अर्धी वाटी दही एकत्र करून खाणं प्रोटीन्स मिळविण्याच्या दृष्टीने जास्त फायदेशीर आाहे, असं आहारतज्ज्ञ सांगतात.4 / 7१ टेबलस्पून चिया सीड्स १ कप दह्यामध्ये भिजत घाला. हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. यामुळे शरीरातली प्रोटीन्सची कमतरता तर भरून निघतेच, पण पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते.5 / 7राजगिऱ्याचं थालिपीठही अधूनमधून खायला हवं आणि त्यात सुकामेवा घालावा. राजगिरा आणि सुकामेवा एकत्र करून खाल्ल्यानेही शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर होण्यास मदत होते.6 / 7भोपळ्याच्या बिया आणि दही हे दोन पदार्थ एकत्र करून खाणंही प्रोटीन्सच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरतं.7 / 7पीनट बटर, भोपळ्याच्या बिया आणि दही हे तीन पदार्थ एकत्र करून खा. यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.