Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ओवा की बडीशेप पाणी? गट हेल्थ सुधारण्यासाठी-पोटासाठी काय बेस्ट? चमचाभर खा - पचन सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2026 20:00 IST

1 / 8
उन्हाळा सुरु झाला की घामामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होत, ज्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर म्हणजेच गट हेल्थवर होतो. वाढत्या तापमानामुळे भूक मंदावणे, पोटात जळजळ होणं, गॅस, अॅसिडीटी आणि अपचनाच्या समस्या वाढतात. अशा वेळी आपण अनेकदा घरगुती उपायांचा आधार घेतो. (Best drink for gut health in summer)
2 / 8
भारतीय स्वयंपाकघरातील दोन महत्त्वाचे घटक म्हणजे ओवा आणि बडीशेप. हे दोन्ही मसाले पचनासाठी उत्तम मानले जातात, पण प्रश्न असा की, कडक उन्हाळ्यात पोटासाठी नेमके 'अमृत' कोणते? ओवा की बडीशेप? (Fennel seeds water benefits for stomach)
3 / 8
उन्हाळ्यासाठी बडीशेप हा सर्वात उत्तम पर्याय आहे. हे थंड असते. याचं पाणी प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी होते.
4 / 8
ओवा हा गॅस आणि पोटदुखीवर रामबाण आहे, पण तो उष्ण असतो. उन्हाळ्यात जर आपल्याला खूप जास्त गॅसचा त्रास असेल, तरच ओव्याचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.
5 / 8
उन्हाळ्यात पोटात होणारी जळजळ आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी फायदेशीर आहे. जेवणानंतर बडीशेपचे पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन नीट होते आणि अपचनाचा त्रास होत नाही.
6 / 8
उन्हाळ्यात काही जड पदार्थ खाल्ल्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटत असेल, तर ओव्याचे पाणी प्या. पोटातील मुरडा किंवा पेटके कमी करण्यासाठी ओवा गुणकारी आहे.
7 / 8
चमचाभर बडीशेप रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. त्यात खडीसाखरही घालू शकता.
8 / 8
चमचाभर बडीशेप रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. त्यात खडीसाखरही घालू शकता.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स