भीषण उष्णतेमुळे नाकातून रक्त येतंय...घाबरू नका, या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

Updated:April 12, 2025 11:21 IST2025-04-12T11:08:29+5:302025-04-12T11:21:49+5:30

Nose bleeding home remedies : उन्हाळ्यात कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे अशा समस्यांसोबतच अनेकांना नाकातून रक्त येण्याची सुद्धा समस्या होते.

भीषण उष्णतेमुळे नाकातून रक्त येतंय...घाबरू नका, या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

Home Remedies for Nose Bleeding : जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे अशा समस्यांसोबतच अनेकांना नाकातून रक्त येण्याची सुद्धा समस्या होते. त्यामुळे चक्कर येते किंवा काही लोक बेशुद्धही पडतात. अर्थात अचानक नाकातून रक्त येत असेल तर कुणालाही भीतीच वाटेल. पण जास्त घाबरण्याची गरज नाही.

भीषण उष्णतेमुळे नाकातून रक्त येतंय...घाबरू नका, या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

अ‍ॅलर्जी, नाकातील नसा किंवा ब्लड वेसल्स डॅमेज असणं, जास्त उष्णता, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, सायनस, मलेरिया, टायफॉइड, जास्त शिंका इत्यादी कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकतं. पण याला फार घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला उन्हात कामानिमित्त जास्त बाहेर जावं लागत असेल तर काही उपाय तुम्हाला माहीत असले पाहिजे. जे करून नाकातून येणारं रक्त लगेच थांबतं.

भीषण उष्णतेमुळे नाकातून रक्त येतंय...घाबरू नका, या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

व्यक्तीच्या नाकातून रक्त येऊ लागलं तर त्याला लगेच खाली जमिनीवर झोपवा. जेणेकरून नाकातून येणारा रक्तप्रवाह बंद होईल. याने चक्कर येणे, घाबरल्यासारखं वाटणे, भीती याची समस्या दूर होतील.

भीषण उष्णतेमुळे नाकातून रक्त येतंय...घाबरू नका, या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

एसेंशिअल ऑइलनं सुद्धा नाकातून येणारं रक्त थांबवलं जाऊ शकतं. यासाठी तुम्ही लॅव्हेंडर ऑइलचे काही थेंब एक कप पाण्यात टाका. पाण्यात पेपर टॉवेल भिजवून बाहेर काढा आणि त्याचं पाणी पिळून घ्या. हा पेपर नाकावर ठेवा. तुम्ही या पाण्याचे काही थेंबही नाकात टाकू शकता.

भीषण उष्णतेमुळे नाकातून रक्त येतंय...घाबरू नका, या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

नाकातून रक्त येत असेल तर व्यक्तीच्या डोक्यावर थंड पाणी टाका. तसेच एका कपड्यात बर्फ गुंडाळून तो नाकावर काही वेळासाठी लावून ठेवा. याने नाकातून येणारं रक्त लगेच बंद होईल.

भीषण उष्णतेमुळे नाकातून रक्त येतंय...घाबरू नका, या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

नाकातून येणारं थांबवण्यासाठी कांद्याचा रसही फायदेशीर ठरतो. यासाठी कांद्याचा थोडा रस काढा. कापसाच्या बोळ्याने हा रस नाकाला लावा आणि दोन-तीन मिनिटे तसाच राहू द्या. तसेच कापलेला कांदा नाकाजवळ धरला तर त्यानेही ब्लड क्लॉटिंगसाठी मदत मिळते.

भीषण उष्णतेमुळे नाकातून रक्त येतंय...घाबरू नका, या घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम

व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूलमधील ऑइल नाकावर कापसाच्या मदतीनं लावा आणि थोड्या वेळासाठी व्यक्तीला बेडवर झोपवला. जेव्हाही नाक ड्राय वाटेल या तेलाचा वापर करा. याने त्वचेवर ओलावा निर्माण होतो. याने नाकातून येणारं रक्तही बंद होतं.