हिवाळ्यातलं स्वस्तात मस्त टॉनिक म्हणजे 'ही' ५ फळं, सततची आजारपणं टळून सौंदर्यही खुलेल..
Updated:November 24, 2025 12:09 IST2025-11-24T11:59:27+5:302025-11-24T12:09:29+5:30

हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप असे त्रास खूप वाढतात. त्यामुळे या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं असतं.
शिवाय हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्या जातं. त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रासही खूप जणांना होतो. हा त्रास कमी करण्यासाठी काही फळं खाणं खूप गरजेचं असतं.
ती फळं खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारी तर दूर होतातच, पण हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी पडण्याचा जो त्रास होतो, तो ही कमी होताे. हिवाळ्यात आपल्या आरोग्यासाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करणारी ती फळं कोणती ते पाहूया..
हिवाळ्यात आवळा आवर्जून खायला हवा. आवळ्यातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. हिवाळ्याच्या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारपण टाळण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो.
या दिवसांत बाजारात पेरू मिळतो. त्याचा आस्वादही नक्की घ्या. कारण पेरुमधूनही व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात मिळते. शिवाय पेरूमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे हिवाळ्यात होणारा कॉन्स्टिपेशनचा त्रासही कमी होतो.
हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी होऊन त्वचेवरचा ग्लो कमी होतो. हे टाळण्यासाठी या दिवसांत संत्री खायला हवी. संत्री नियमितपणे खाल्ल्यास त्वचेमध्ये खूप छान परिणाम दिसून येतो. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
डाळिंबामुळे शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो. डाळिंब नियमितपणे खाल्ल्यास शरीरात लोह शोषून घेण्यास मदत होते.
हिवाळ्यात सफरचंद खायलाही विसरू नका. कारण त्यामध्ये सोल्युबल फायबर जास्त प्रमाणात असतात. पचनक्रिया आणि चयापचय क्रिया सुधारण्यासाठी ते फायदेशीर ठरतात.