1 / 6माेहरीचं तेल आणि हिंग यांचा एकत्रित वापर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. पचनापासून ते केसांची वाढ चांगली होण्यापर्यंत त्याचे कित्येक वेगवेगळे उपयोग आहेत.2 / 6इंडिया टुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहरीचं तेल आणि हिंग एकत्रित करून स्वयंपाकात वापरल्याने पचनाशी संबंधित त्रास कमी होऊ शकतात. फोडणीसाठी मोहरीचं तेल वापरणे आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग घालणे असा एक उपाय तुम्ही करू शकता.3 / 6मोहरीचं तेल थोडं कोमट करावे आणि त्यात हिंग घालून डोक्याला मालिश करावी. यामुळे त्वचेखालील रक्ताभिसरण सुरळीत होऊन केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. 4 / 6मोहरीच्या तेलात चिमूटभर हिंग घालून त्वचेला मालिश केल्यास त्वचा चमकदार होते. पण असं करताना आधी पॅचटेस्ट जरूर घ्यावी.5 / 6सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठीही मोहरीचं तेल आणि हिंग हे मिश्रण खूप उपयुक्त ठरतं. यासाठी सुरुवातीला मोहरीचं तेल थोडं गरम करून घ्यावं आणि नंतर त्यामध्ये हिंग घालावा.6 / 6डोकं खूप दुखत असेल तर मोहरीच्या तेलात हिंग घालून डोक्याला मालिश करा. डोकेदुखी थांबेल.