1 / 6किडनी स्टोनचा त्रास बऱ्याच जणांना होतो. हा त्रास असणारे बरेचसे लोक एक चूक प्रामुख्याने करतात आणि त्यामुळे मग शरीरातले कॅल्शियम कमी होते.2 / 6शरीरातलं कॅल्शियम कमी झालं की मग हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे मग किडनी स्टोनच्या त्रासासोबतच हाडांचं दुखणंही मागे लागतं. हा त्रास टाळायचा असेल तर आहारातल्या काही चुका प्रामुख्याने टाळायला हव्या, अशी माहिती आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. 3 / 6त्या सांगतात की हा किडनी स्टोनचा त्रास हा प्रामुख्याने शरीरातलं कॅल्शियम ऑक्झालेट वाढल्यामुळे होतो. त्यामुळे कॅल्शियम असणारे पदार्थ अनेक जण कमी प्रमाणात खातात. पण हे चुकीचं आहे. 4 / 6आपल्याला फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की शरीरात कॅल्शियम ऑक्झालेट हे संयुग तयार होऊ द्यायचं नाही. त्यासाठी आपण कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ले तरी चालतात पण ज्या पदार्थांमध्ये ऑक्झालेट असतं असे पदार्थ खाणं टाळायला हवं.5 / 6ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया.. त्यापैकी पहिला पदार्थ आहे टोमॅटो. टोमॅटो खाणं टाळायला हवं.6 / 6किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी टोमॅटोसोबतच पालक खाणंही टाळायला हवं. कारण पालकामध्येही ऑक्झालेट भरपूर प्रमाणात असतं.