Join us

महिलांसाठी महत्त्वाची गोष्ट, शरीरातील कॅल्शियम आणि पोटॅशियम कमी झालं की तुमचं रोजचं जगणंच मुश्किल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 19:36 IST

1 / 8
शरीरातील कोणतेही एक सत्व जरी कमी झाले तरी शरीराला त्याचा त्रास होतो. विविध आजारांचे मुख्य कारण शरीराला योग्य पोषण मिळत नाही हेच असते. त्यामुळे आहार चांगलाच घेतला पाहिजे. तसेच इतरही सवयी चांगल्या असणे गरजेचे आहे.
2 / 8
हाडांसाठी अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे कॅल्शियम. तसेच पॉटॅशियमही शरीरासाठी फार गरजेचे असते. इतरही अनेक गुणधर्म आहेत जे गरजेचे असतात. जसे की लोह, फायबर, विविध जीवनसत्वे. शरीराला योग्य अन्नातून हे सारे मिळते.
3 / 8
शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यास हाडे खिळखिळी होतात. तसेच दातांवरही परिणाम होतो. स्नायू कमकुवत होतात. मज्जासंस्थेवर परिणाम होतो.
4 / 8
शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी जीवनासत्व डी देणारे पदार्थ खा. तसेच सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा. आहारात दूध तसेच दही घ्या. पनीर सारखे पदार्थ आहारा असावेत. तसेच तीळ आहारात असणे उपयुक्त ठरते.
5 / 8
पालकाची भाजी कॅल्शियमसाठी फार चांगली. बीटाचा रस प्या. कडीपत्ताही कॅल्शियमसाठी चांगला. नाचणीचे पदार्थ खावेत. मूग डाळ तसेच तूर डाळ आहारात असावी. राजगिरा कॅल्शियम वाढवण्यासाठी मदत करतो.
6 / 8
शरीरातील पोटॅशियम कमी झाल्यावर थकवा जाणवतो. हृदयावर ताण येतो. तसेच भूक कमी होते आणि मळमळते. इतरही अनेक परिणाम होतात.
7 / 8
पोटॅशियम वाढवण्यासाठी केळी खाणे फायद्याचे ठरते. तसेच बटाटा आहारात घ्या. तेलकट नाही तर उकडलेला बटाटा किंवा विविध प्रकारच्या डाळी खाव्यात. नारळ आहारात असावा. टोमॅटो खा. संत्री पपई अशी फळे पोटॅशियम वाढवतात.
8 / 8
आहार चांगला घेणे, व्यायाम करणे आणि वेळोवेळी चेकअप करणे गरजेचे असते. महिलांमध्ये कॅल्शियम पोटॅशियमची कमतरता एका ठराविक वयात जाणवायला लागते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचेच.
टॅग्स : अन्नआरोग्यहेल्थ टिप्स